Advertisement

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या दादर-परळ स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
SHARES
Advertisement

मध्य रेल्वेच्या दादर-परळ स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास सिग्नल यंत्रणेच बिघाड झाल्यानं अप-डाऊन धिम्या आणि जलद मार्गावरील लोकल फेऱ्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. 


प्रवाशांचा खोळंबा

सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं दादर - परळ आणि माटुंगा - दादर स्थानकादरम्यान   लोकलच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. बराच वेळ लोकलमध्ये अडकून पडल्याने अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरत दादर स्थानक गाठले. भर उन्हात मोठी पायपीट झाल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.  रविवारी मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा होतो. मात्र, आठवड्याच्या पहिल्या दिवशीच वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. मध्य रेल्वेकडून नेमका काय बिघाड झाला आहे याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
संबंधित विषय
Advertisement