Advertisement

प्रिया दत्त पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात? पूनम महाजनांविरोधात लढण्याची शक्यता

काँग्रेसच्या श्रेष्ठींनी माजी खासदार प्रिया दत्त यांची मनधारणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रिया दत्त पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात? पूनम महाजनांविरोधात लढण्याची शक्यता
SHARES

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून पुन्हा एकदा दिग्गजांना संधी मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी लोकसभेच्या रिंगणात दक्षिण मध्य मुंबईतील जागेसाठी मिलिंद देवरा यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर आता काँग्रेसच्या श्रेष्ठींनी माजी खासदार प्रिया दत्त यांची मनधारणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुन्हा प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


उत्तर मध्य मुंबईतून लढणार

शुक्रवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईतील सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं होतं. त्यावेळी व्यासपीठावर प्रिया दत्त यादेखील उपस्थित होत्या. त्यानंतर आता उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याविरोधात प्रिया दत्त निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांदरम्यान दत्त यांना पूनम महाजनांकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर प्रिया दत्त यांनी वैयक्तिक कारणांमुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नुकतंच त्यांनी पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार असल्याचे म्हटले होते.      


कोणाला संधी ?

२०१४ साली झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी प्रिया दत्त यांना आहे. २००५ मध्ये सुनिल दत्त यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रिया दत्त विजयी झाल्या होत्या. त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकांमध्येही त्यांना विजय मिळाला होता. परंतु आता त्या पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर कृपाशंकर सिंह, अभिनेत्री नगमा यांनीही दावा दाखवला आहे. त्यामुळे आता कोणाला संधी मिळेल हे पहावं लागणार आहे. उत्तर पश्चिम मतदार संघातून संजय निरूपम, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड अथवा भालचंद्र मुणगेकर आणि उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांच्या नावांची चर्चा आहे.


हेही वाचा - 

लवकरच म्हाडाच्या २१७ घरांसाठी लॉटरी

नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा