Advertisement

म्हाडाच्या २१७ घरांसाठी लवकरच लॉटरी

रविवारी म्हाडाने पवई आणि चेंबूरमधील २१७ घरांची लॉटरी काढणार असल्याची घोषणा केली. याव्यतिरिक्त म्हाडा २७६ दुकांनांचीही लॉटरी काढणार आहे

म्हाडाच्या २१७ घरांसाठी लवकरच लॉटरी
SHARES

रविवारी म्हाडाने पवई आणि चेंबूरमधील २१७ घरांची लॉटरी काढणार असल्याची घोषणा केली. याव्यतिरिक्त म्हाडा २७६ दुकांनांचीही लॉटरी काढणार आहे. यापैकी अनेक दुकाने आणि घरे मुंबईत तर काही विरार आणि वेंगुर्ल्यात आहेत.


२१ एप्रिलला लॉटरी

२१ एप्रिल रोजी घरांची तर ८ एप्रिल रोजी दुकांनांची लॉटरी निघण्याची शक्यता आहे. याच्या अंतिम तारखेची घोषणा लवकरच करण्यात येईल. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मुंबईतील १ हजार ३८४ घरांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यासाठी तब्बल १ लाख ६४ हजार अर्ज आले होते. परंतु यावेळी २१७ घरांपैकी ४७ मध्यम आणि अन्य घरे अल्प गटासाठी आहेत. लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ७ मार्च रोजी दुपारी २ वाजता सुरू होणार असून १३ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. एमआयजी गटासाठी ३० हजार तर एलआयजी गटासाठी २० हजार रूपये शुल्क भरावे लागणार आहे. 


चेंबूरमध्ये सर्वाधिक घरं

पवईमध्ये म्हाडाची ४६ घरं असून उर्वरित घरं चेंबूरमधील शेल टॉवरमध्ये असतील. पवईतील घरांची किंमत सर्वाधिक म्हणजेच ५६.६३ लाख असेल. तर उर्वरित घरांची किंमत ३१.५४ लाख ते ३९.६४ लाखांच्या दरम्यान असतील. 



हेही वाचा - 

Movie Review : डोक्यावर पडलेल्या शहाण्या मित्राची गोष्ट

नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा