Advertisement

गिरगाव आणि जुहू चौपाटीला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा

अन्न पदार्थाचा दर्जा राखून ग्राहकांना स्वच्छ वातावरणात चांगल्या प्रतीच्या सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचा आस्वाद घेता यावा, यासाठी देशांतर्गत ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थाची विक्री केली जाते, अशा ठिकाणी ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

गिरगाव आणि जुहू चौपाटीला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा
SHARES

गिरगाव आणि जुहू चौपाटीलाा ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा देण्यात आला आहे. त्या अनुषंगानं मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्धाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


स्वच्छतेला प्राधान्य

अन्न पदार्थाचा दर्जा राखून ग्राहकांना स्वच्छ वातावरणात चांगल्या प्रतीच्या सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचा आस्वाद घेता यावा, यासाठी देशांतर्गत ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थाची विक्री केली जाते, अशा ठिकाणी ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’  ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ आणि निर्भेळ अन्न मिळावे म्हणून अन्न पदार्थाबरोबरच सभोवतालचा परिसर स्वच्छता आदी बाबींचे परिक्षण करून त्या ठिकाणाला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ चा दर्जा देण्यात येतो. यापूर्वी अहमदाबादमधील कांकरिया लेकला देशातील पहिले ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 


महाराष्ट्र दुसरे राज्य

गिरगाव आणि जुहू चौपाटी येथील अन्न व्यवसायिकांची स्वच्छतेसंदर्भातील मानकांची पूर्तता तसंच अन्न सुरक्षितेबाबत सर्व निकषांचं पालन होत असल्यानं या दोन्ही चौपाट्यांना ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातील ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’ दर्जा मिळवणारं दुसरं राज्य ठरलं आहे.
हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा पाऊस; सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढणार

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय