Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा पाऊस; सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढणार

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १८० नवीन सरकते जिने लावण्यात येणार आहेत.

रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा पाऊस; सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढणार
SHARES

मुंबईत रेल्वे प्रवाशांचा प्रवास सखकर होण्यासाठी विविध सुविधांसह सरकते जिने, लिफ्ट आणि पादचारी पुलांची कामे वेगानं सुरू असून, भविष्यात यांची दुप्पट सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १८० नवीन सरकते जिने लावण्यात येणार आहेत. त्यामुळे महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांना ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दिली. 


प्रवाशांना सुखद धक्का

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या परळ टर्मिनसचे लोकार्पण रविवारी करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी भविष्यात १८० सरकते जिने आणि १७० लिफ्टच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली.  याशिवाय प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधांसह अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पांना देखील मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं येत्या काळात प्रवाशांना सुखद धक्का बसण्याची शक्यता आहे.


१७० लिफ्टना मंजुरी

२०१४ पूर्वी मुंबई लोकल मार्गावर १६ सरकते जिने होते. त्यानंतर, मुंबईत सद्यस्थितीत ११२ सरकते जिने असून, १८० सरकत्या जिन्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांकरीता मध्य आणि पश्चिम रेल्वेवर एकूण ७८ लिफ्ट सुरू असून, आणखी १७० लिफ्टना मंजुरी देण्यात आली आहे. त्याशिवाय, एप्रिल २०१४ नंतर रेल्वे मार्गवर आतापर्यंत १२९ पादचारी पूलांचे बांधकाम करण्यात आले असून, सध्या १३० पादचारी पुलांवर काम सुरू आहे. तसंच, या पुलांचे बांधकाम येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.


अलिबाग पॅसेंजर

मुंबईकरांना पर्यटनस्थळी रेल्वेनं प्रवास करता यावा यासाठी आता रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. अलिबाग ते पेण मार्गावर नवीन पॅसेंजर ट्रेन सुरू करण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी केली. त्यामुळे अलिबाग-मुंबई प्रवास करणं सहज शक्य होणार असून मुंबईकरांची सुट्टी मजेशीर होणार आहे.


मुंबई लोकल सुविधा


सरकते जिने 
लिफ्ट    
पादचारी पूल 
२०१४ च्या आधी -१६
२०१४ च्या आधी -३
 २०१४ च्या आधी -३२०
सद्यस्थितीत - ११२
सद्यस्थितीत - ९४
(७८ पूर्ण, १६ लिफ्टचे काम सुरू)
सद्यस्थितीत -१२९
मंजूर - १८०
मंजूर - १७०
मंजूर - १३०


 


हेही वाचा -

प्रिया दत्त पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात? पूनम महाजनांविरोधात लढण्याची शक्यता

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्पसंबंधित विषय
Advertisement