Advertisement

मंतरलेल्या घरात' पुन्हा एकत्र आले सुयश-सुरुची

झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या 'का रे दुरावा' या मालिकेतील सुयश टिळक आणि सुरुची अडारकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

मंतरलेल्या घरात' पुन्हा एकत्र आले सुयश-सुरुची
SHARES

छोट्या पडद्यावर काय किंवा मोठ्या पडद्यावर काय कलाकारांची एखादी जोडी प्रेक्षकांना आवडली की ती पुन: पुन्हा जुळते. झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या 'का रे दुरावा' या मालिकेतील सुयश टिळक आणि सुरुची अडारकर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.


केमिस्ट्री भावली

'का रे दुरावा' या मालिकेतील सुयश-सुरुची यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. आता झी युवा वाहिनीवर सुरू झालेल्या 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत सुयश आणि सुरुची पुन्हा एकत्र आले आहेत. 'का रे दुरावा' या मालिकेनंतर या जोडीनं मराठी रंगभूमीवर 'स्ट्रॉबेरी' हे नाटक केलं होतं. त्यातील त्यांची केमिस्ट्रीही रसिकांना आकर्षित करणारी ठरली होती. आता प्रेक्षकांची ही आवडती जोडी 'एक घर मंतरलेलं' या मालिकेसाठी पुन्हा एकदा एकत्र आली आहे.


न्यूज रिपोर्टरच्या भूमिकेत

काहीतरी अनपेक्षित घटना घडणारं, काहीसं गूढ आणि रहस्यमय वातावरण असलेल्या 'एक घर मंतरलेलं' या मालिकेत सुरुची एका न्यूज रिपोर्टरच्या भूमिकेत असून, सुयशच्या व्यक्तिरेखेबद्दल अजूनही गुप्तता बाळगण्यात आली आहे. सुयशची भूमिका देखील तितकीच दमदार आणि वेगळी असेल असं मात्र वाहिनीच्या वतीनं सांगण्यात येत आहे. तूर्तास ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्यानं या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेत सुरुची-सुयश ही गाजलेली जोडी काय कमाल करते ते पहायचं आहे.



हेही वाचा -

गिरगाव आणि जुहू चौपाटीला ‘क्लिन स्ट्रीट फूड हब’चा दर्जा

म्हाडाच्या २१७ घरांसाठी लवकरच लॉटरी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा