११ लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी ऑनलाइन उपलब्ध

मुंबई विद्यापीठाने गेल्या सहा वर्षातील जवळपास ११ लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी (नॅड) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठाने गेल्या सहा वर्षातील जवळपास ११ लाख पदव्यांचा तपशील पडताळणीसाठी नॅशनल अकॅडेमिक डिपॉझिटरी (नॅड) या केंद्र सरकारच्या डिजिटल पोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तपशील तात्काळ उपलब्ध होणार असून नॅडच्या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर या सेवेचा विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. 


बोगस प्रमाणपत्रांना आळा 

मुंबई विद्यापीठाच्या या सेवेसाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) या संस्थेची नियुक्ती केली आहे. यानुसार विद्यापीठाने २०१३ पासून ते २०१९ पर्यंत (सहा वर्षे) विद्यापीठ स्तरावर नोंदणी असलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती या नॅडच्या ऑनलाईन पोर्टलवर करून दिलेली आहे. मुंबई विद्यापीठाच्या या नव्या सेवेमुळे बोगस प्रमाणपत्राच्या प्रकरणांना आळा बसणार आहे. 


अशी प्राप्त करा पदव्यांचा तपशील

मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या पदव्यांच्या तपशीलासाठी विद्यार्थ्यांना  www.mu.ac.in या विद्यापीठाच्या वेबसाईटवर भेट देणे अनिर्वाय असणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर खाली ऑनलाईन नॅड रजिस्ट्रेशनसाठी एक लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांना वैयक्तीक माहिती, फोटो, डिजिटल स्वाक्षरी, शैक्षणिक माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी, पासवर्ड टाकल्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्यांच्या तपशील उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एनएसडीएलचे प्रतिनिधी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये भेट देणार आहेत. 


अशा आहे पदवीचा तपशील 


वर्ष विद्यार्थी संख्या
२०१४
१ लाख ९३ हजार ३९८
२०१५
१ लाख ८५ हजार ४६७
२०१६
१ लाख ६१ हजार ९१४
२०१७
१ लाख ६८ हजार ७४३
२०१८
१ लाख ८९ हजार ५३८
०१९
१ लाख ९३ हजार ५८९
एकूण
१० लाख ९२ हजार ६४९


या नव्या सुविधेमुळे देशातील तसेच विदेशातील शासकीय,खासगी आस्थापना,विद्यार्थी व इतरांना या शैक्षणिक अभिलेखाची पडताळणी ऑनलाईन स्वरूपात तात्काळ करता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पदवी पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठात येण्याची आवश्यकता भासणार नाही. 

  - डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू मुंबई विद्यापीठहेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा पाऊस; सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढणार

मंगळवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावरसंबंधित विषय
ताज्या बातम्या