Advertisement

मंगळवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर

शिक्षण विभागाद्वारे लागू करण्यात आलेली सुधारित प्रगती योजना रद्द केल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ मार्चपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

मंगळवारी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संपावर
SHARES

आपल्या निरनिराळ्या मागण्यांसाठी मंगळवारी शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. शिक्षण विभागाद्वारे लागू करण्यात आलेली सुधारित प्रगती योजना रद्द केल्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ५ मार्चपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये १ हजार ५०० पेक्षा अधिक महाविद्यालयातील २२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश असेल.


योजना रद्द

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. २०१८ पर्यंत कर्मचाऱ्यांना सुधारित प्रगती योजनेअंतर्गत वेतन देण्यात येत होतं. परंतु ७ डिसेंबर २०१८ आणि १६ फेब्रुवारी २०१९ रोजी सरकारने जुनी योजना रद्द करण्याचा जीआर काढल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली. याचाच परिणाम शिक्षकांच्या वेतनावर होणार आहे. याच्याच निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या संपामध्ये महाविद्यालयातील शिक्षकांव्यतिरिक्त सफाई कर्मचारी, क्लार्क आणि शिपायांसह अन्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.



हेही वाचा -

सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

लवकरच म्हाडाच्या २१७ घरांसाठी लॉटरी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा