भारताच्या सीआयडीची वेबसाईट दहशतवाद्यांनी आज सकाळी हॅक केली. CAA आणि NRC वरून भारतात मुस्लिमांना लक्ष करून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. मुस्लिमांना त्रास देऊन नका अन्यथा परिणाम वाईट होतील असा संदेश दहशतवाद्यांनी दिला. त्याच बरोबर मुस्लिम बांधवाना अनुसरून लवकरच इमाम मेहदी येतोय तुम्हच्या रक्षणासाठी असा संदेश दहशतवाद्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचाः- महिला डब्यांत घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांवर कारवाई
भारतात CAA आणि NRC विरोधात ठिक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. देशाची राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमिवर दहशतवाद्यांनी सीआयडीची वेबसाईट हॅक केली आहे. शुक्रवारी सकाळी ही वेब साईट हॅक करून दहशतवाद्यांनी मोदीसरकारने मुस्लिम बांधवांना लक्ष करणे थांबवा, अन्यथा परिणाम वाईट होतील असा संदेश दिला आहे. त्याच बरोबर मुस्लिम बांधवांना अनुसरून दहशतवाद्यांनी मुस्लिम बांधवांनी घाबरून जाऊ नका, लवकरच तुम्हच्या मदतीसाठी इमाम मेहदी तुम्हच्याकडे येतो आहे. हा इमाम मेहदी कोण आहे. याबाबत कोणतिही माहिती देण्यात आलेली नाही. या वेबसाईटवर ‘द गव्हरमेंट आॅफ इमाम मेहदी’ या नावाने अश्वारूढ व्यक्तीच्या हातात काळा झेंडा घेऊन असलेला फोटो ही टाकलेला आहे.
दहशवाद्यांनी सीआयडीची अधिकृत वेबसाईट हॅक केल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. हे कृत्य आयएसआय या दहशतवादी संघटनेने केले असण्याचा संशय सुरक्षा यंत्रणेने वर्तवला आहे. त्यामुळेदिल्ली, मुंबईसह प्रमुख शहरांची सुरक्षा वाढवण्यात येऊ शकते.