महिला डब्यांत घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांवर कारवाई

लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांना पश्चिम रेल्वेवर (Western Railway) गेल्या वर्षभरात पकडण्यात आले आहे.

महिला डब्यांत घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांवर कारवाई
SHARES

रेल्वेनं प्रवास करताना अनेक प्रवासी अपंगांच्या (handcapped) व महिलांच्या डब्यांतून (Ladies Coach) प्रवास करताना पाहायला मिळतं. अशा प्रवाशांना अनेकदा रेल्वे (Railway) प्रशासनाकडून सुचनाही करण्यात येतात. मात्र, तरीही प्रवाशी महिलांच्या डब्यातून प्रवास करतात. अशा लोकलच्या महिला डब्यात घुसखोरी करणाऱ्या १७ हजार पुरुष प्रवाशांना पश्चिम रेल्वेवर (Western Railway) गेल्या वर्षभरात पकडण्यात आले आहे.

या घुसखोरीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रवाशांनी किमान ही घुसखोरी महिला दिनी (Woman's day) तरी थांबावी, यासाठी ३ दिवस विशेष मोहीम (Special campaign) हाती घेण्यात येणार आहे. ५ मार्च ते ८ मार्चपर्यंत विशेष मोहीम चालणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. १२ डबा लोकलमध्ये महिलांसाठी द्वितीय श्रेणी (Second Class) आणि प्रथम श्रेणीचा (First Class) डबा राखीव असतो. या डब्यात पुरुष प्रवाशानं घुसखोरी केल्यास त्याला दंड होतो. मात्र, अशा घुसखोरांवर कारवाई करूनही परिस्थिती पुन्हा जैसे थेच असते.

प्रवासात महिलांची छेडछाड, मारहाण इत्यादी घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी डब्यात रात्री ८ वाजल्यानंतर सुरक्षारक्षक नेमला जातो. तर काही डब्यात सीसीटीव्ही कॅमेरेही (CCTV) बसवण्यात आले आहेत. परंतु यानंतरही घुसखोरांना आळा बसलेला नाही.

महिला डब्यात पुरुष प्रवाशांनी घुसखोरी केल्यानं २०१९ मध्ये १४ हजार ३०७ जणांना पकडण्यात आलं होतं. २०२० मधील जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मिळून २ हजार ९८१ प्रकरणे दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये एकूण ३७ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

प्रवाशांची ही घुसखोरी पाहता किमान महिलादिनी (Woman's day) तरी घुसखोरी होऊ नये यासाठी ५ मार्च ते ८ मार्चपर्यंत पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर विशेष मोहीम (Special campaign) हाती घेतली जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त घुसखोरांना पकडण्याचा प्रयत्न असेल, तर त्यांना रेल्वे न्यायालयाकडून (Railway Court) अधिकचा दंड होण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याची माहिती मिळते.हेही वाचा -

मुंबईतील 'या' ठिकाणी २०३ लोकांचा मृत्यू

मध्य, पश्चिम रेल्वेने भंगारातून कमविले ८१० कोटीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा