Advertisement

मुंबईतील 'या' ठिकाणी २०३ लोकांचा मृत्यू

मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये तुलनेनं घट झाली असली, तरी एकूण ५८ अपघातप्रवण ठिकाणांवर ९०३ अपघात झाले

मुंबईतील 'या' ठिकाणी २०३ लोकांचा मृत्यू
SHARES

मुंबईतील खासगी (Private) व सरकारी (Government) वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढीव संख्येमुळं मोठ्या प्रमाणात अपघात (Accident) होत आहेत. मात्र, काही महिन्यांपासून मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये (Road Accident) तुलनेनं घट झाली असली, तरी एकूण ५८ अपघातप्रवण ठिकाणांवर ९०३ अपघात झाले. यामध्ये २०३ जणांचा मृत्यू झाल्याची लेखी माहिती (Written Information) गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत शिवसेना आमदार विलास पोतनीस (Shiv Sena MLA Vilas Potnis) यांनी मुंबईतील अपघातांबाबतचा (Mumbai Accidents) तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुंबईतील ५८ अपघात प्रवण क्षेत्रात मागील ३ वर्षात ९०३ अपघात झाल्याची माहिती समोर येत असून, यामध्ये एकूण २०३ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मुंबईतील या ५८ ठिकाणांवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. याठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. गरजेनुसार वाहतूक अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पादचारी रस्ता ओलांडत असल्यामुळं या ठिकाणांवर अपघात होतात. त्यामुळं स्कायवॉकचा वापर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत.

विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी पेट्रोलींग, वाहतूक सुरक्षा पंधरवडा असं प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख लेखी उत्तरात स्पष्ट केली आहे. त्यामुळं या ५८ ठिकाणांवरील अपघात थांबणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

मध्य, पश्चिम रेल्वेने भंगारातून कमविले ८१० कोटी

कोस्टल रोडने घेतले दोन पोलिसांचे बळी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा