मुख्यमंञी उद्धव ठाकरेंचा महत्वकांशी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोस्टल रोडचे काम सध्या जोरात सुरू असताना. या कामसाठी वापरले जाणारे डंपर भायखळा उड्डाणपुलावर रस्त्यात अडकल्याने भोईवाडा वाहतूक पोलिस विभागातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.
मुंबईतील माझगाव परिसरातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भवनला 17 फेब्रुवारी रोजी भीषण आग लागली. या आगीत जीएसटी भवनाचा आठवा आणि नववा मजला जळून खाक झाला.आग विझवण्यासाठी घटनास्थळी 20 गाड्या पाठवल्या, सुदैवाने यात कोणतिही दुर्घटना नाही झाली. माञ आग लागल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या जीएसटी भवनजवळ येण्यास उशिर झाल्याचे निदर्शनास आले.
मूळात आगीचे वृत्त मिळताच अग्निशमन दल भायखळा उड्डाणपुल मार्गे त्या ठिकाणी येण्यासाठी निघाले, माञ पुलावर कोस्टल रोडला भराव टाकण्यासाठी वापरले जाणारे मोठे डंपर अडकल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी 9 वा अडकलेला ट्रक दुपारपर्यंत तसाच होता. मूळात सकाळी 7 ते दुपारी 11 या वेळेत अवजड वाहनांना बंदी असताना हे डंपर मुंबईत आले कसे, तसेच उड्डाण पुलावरून जाण्यास त्यांना बंदी असताना देखील ते कोणाच्या मेहरबानीने उड्डाण पुलावर गेले हे अद्याप पुढे आले नाही.
या वाहतूक कोंडीत अग्निशमन दलाच्या गाड्या अडकल्यामुळे त्यांना येण्यास उशिर झाला. असा ठपका ठेवत त्या दिवशी गस्तीवरील पोलिस शिपाई सुनिल लांडे, गजानन पवार हे वाहतूक पोलिसांचे शिपाई गस्तीवर होते. त्यामुळे या दोघांना सेवेतून निलंबित केल