प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीची विनयभंगाची तक्रार

शरीर सुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात विद्यार्थिनीने गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली अाहे. दिलीप हरीजन असं या प्राध्यापकाचं नाव असून तो भवन्स काॅलेजमध्ये केमिस्ट्री विषय शिकवतो. 

पास करण्याचं अामिष

गिरगावमध्ये राहणारी तक्रारदार तरूणी भवन्स काॅलेजमध्ये शिकत अाहे. सर्व विषयात पास करतो असे सांगून हा प्राध्यापक तरुणीकडे शारिरीक सुखाची मागणी करायचा. फोन करून तिला त्रासही द्यायचा. त्यामुळे अनेक दिवसांपासून तरुणी मानसिक तणावाखाली होती.  रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर तिने गावदेवी पोलिस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा - 

कुरिअर बाॅयकडून महिलेवर जिवघेणा हल्ला; दादरमधील घटना

भीक मागताना गुंड इजाज लकडावालाच्या भावाला अटक; जामिनावर सुटून होता फरार


पुढील बातमी
इतर बातम्या