डोंबिवली : पोलिसाच्या पत्नीचा भाजप नेत्यावर विनयभंगाचा आरोप

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) डोंबिवली पदाधिकारी नंदू जोशी यांच्याविरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी मानपाडा पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, जोशी यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बगाडे म्हणाले, "फिर्यादीनुसार नंदू जोशी याने महिलेला फ्लॅट रिकामा करण्यास भाग पाडले आणि तिच्याकडे वारंवार लैंगिक सुखाची मागणी केली. पोलिस कर्मचारी असलेला पती आणि जोशी यांच्यात वाद सुरू होता. फिर्यादीने आरोप केला आहे की, जोशी एका प्रकरणात हस्तक्षेप करत होते ज्याचा तिचा नवरा चौकशी करत होता.

पोलिसांनी जोशी विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 A (लैंगिक छळ), 506 (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा) नुसार गुन्हा दाखल केला.

नंदू जोशी यांनी आरोप फेटाळले

जोशी यांनी मात्र आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले असून गेल्या 10 वर्षांत तक्रारदाराशी संवाद साधला नसल्याचे सांगितले. महिलेच्या पतीशी त्याची मैत्री असून अनेक प्रकरणांमध्ये त्याने मदत केली असल्याचा दावा त्याने केला आहे.

"महिलेचा तिच्या पतीकडून छळ होत होता आणि तो माझ्यामुळेच आहे असा तिचा गैरसमज होता. त्यामुळे तिने माझ्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कायद्यानुसार काम करावे; मी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही," असा दावा नंदू यांनी केला.

भाजप कार्यकर्ते नाराज

जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी समजताच भाजपचे कार्यकर्ते चांगलेच तापले आहेत. कल्याणमधील पदाधिकारी शशिकांत कांबळे यांनी आज संबंधित पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करणार असल्याचे मत व्यक्त केले.

कांबळे म्हणाले, "भाजप आणि जोशी यांची बदनामी करण्याचा हा डाव आहे. त्यांच्यावरील खटला खोटा ठरला आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्याने हे प्रकरण घडले आहे."

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोशी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा

बोरिवली : चोर समजून पोलिसाच्याच भावाला मारहाण, उपचाराआधीच मृत्यू

ठाण्यातील 2 प्रसिद्ध साडीच्या दुकान मालकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या