बोरिवली : चोर समजून पोलिसाच्याच भावाला मारहाण, उपचाराआधीच मृत्यू

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे

बोरिवली : चोर समजून पोलिसाच्याच भावाला मारहाण, उपचाराआधीच मृत्यू
SHARES

बोरिवली पूर्व येथील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात २४ आणि २५ मे रोजी मध्यरात्री पोलीस कोठडीत संशयित चोरट्याचा मृत्यू झाला.

बोरिवली पूर्वेकडे वास्तव्यास असलेल्या भावाकडे सिन्नर येथून प्रवीण आला होता. बोरिवली परिसरात बुधवारी मध्यरात्री एकटाच फिरत असताना एका सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने त्याला अडवले. त्यांच्या प्रश्नाला नीट उत्तरे न मिळाल्याने सुरक्षारक्षकाला तो चोर असल्याचा संशय आला. त्याने चोर चोर ओरडत प्रवीणला मारहाण करण्यास सुरुवात केली.

याचवेळी आणखी तीन नागरिक त्या ठिकाणी आले. त्यांनीही प्रवीणला मारहाण करीत त्याच अवस्थेत कस्तुरबा मार्ग पोलिस ठाण्यात नेले. मारहाण झाल्याने पोलिसांनी तत्काळ प्रवीण याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तपासणीनंतर प्रवीण याला पुन्हा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. काही वेळाने त्याच्या छातीत दुखू लागल्याने पुन्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, यावेळी डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

मुंबईतील बोरिवली येथे एका २९ वर्षीय तरुणाची लिंचिंग केल्याप्रकरणी शुक्रवारी किमान ४ जणांना अटक करण्यात आली. चोरीच्या संशयावरून एका व्यक्तीला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता. 25) घडली. यापूर्वी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, "कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २९ वर्षीय व्यक्तीला चोरीच्या संशयावरून लिंचिंग केल्याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे." प्रवीण लहाने असे मृताचे नाव असून तो पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ आहे.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) कलम 304, 143, 144, 147, 148 आणि 149 नुसार गुन्हा दाखल केला आहे.



हेही वाचा

ठाण्यातील 2 प्रसिद्ध साडीच्या दुकान मालकांवर अपहरणाचा गुन्हा दाखल

विरार : बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा