विरार : बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूरसह तिघे निर्दोष

'टाडा' अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

विरार : बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी भाई ठाकूरसह तिघे निर्दोष
SHARES

पुण्यातील न्यायालयाने बुधवारी माजी गुंड जयेंद्र उर्फ भाई ठाकूर आणि इतर तिघांना दहशतवादी आणि विघटनकारी क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा किंवा 'टाडा' अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

विरार येथील बिल्डर सुरेश दुबे यांची 9 ऑक्टोबर 1989 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा रेल्वे स्टेशनवर 6 ते 7 जणांनी गोळ्या घालून हत्या केली होती. (Builder Suresh Dube Murder Case). याप्रकरणी सन 1992 साली टाडा (TADA Act) लावण्यात आला होता तर 17 आरोपींना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, टाडा कोर्टाचा (Pune TADA Court) चार्ज पुण्यातील न्यायालयाकडे असल्याने भारतातील या शेवटच्या टाडा खटल्याचा निकाल विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर (Special Judge Satyanarayan Navander) यांनी दिला आहे. याप्रकरणी जयंत उर्फ भाई विष्णू ठाकूर (Jayant alias Bhai Vishnu Thakur), दीपक ठाकूर (Deepak Thakur) आणि गजानन पाटील (Gajanan Patil) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 

यापुर्वी या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 6 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामध्ये नरेंद्र भालचंद्र भोईर (Narendra Bhalchandra Bhoir), ज्ञानेश्वर पाटील (Dnyaneshwar Patil), उल्हास राणे (Ulhas Rane), पॅट्रीक तुस्कानो (Patrick Tuscano), राजा जाधव (Raja Jadhav) आणि माणिक अनंत पाटील (Manik Anant Patil) यांचा समावेश आहे.

बिल्डर सुरेश दुबे खून प्रकरणी 2004 मध्ये टाडाचे विविध कलमान्वये व आर्मस अ‍ॅक्ट कायद्यानुसार आरोप निश्चत करण्यात आले होते. दरम्यान, आता न्यायालयाने भाई ठाकूर (Bhai Thakur), दीपक ठाकूर आणि गजानन पाटील यांची निर्दोष मुक्तता केली आहे.



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा