Corona positive patients missing from malad: मालाडमधून ७० पॅाझिटिव्ह रुग्ण बेपत्ता

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचं मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर आहे. मात्र, आता आणखी एक आव्हान पालिकेसमोर उभं ठाकलं आहे. कोरोनाचे हाटस्पाँट बनलेल्या पी वार्डातून कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आलेले तब्बल ७० पेक्षा अधिक रुग्ण बेपत्ता असल्याचे पुढे आले आहेत. या रुग्णांना शोधण्याचं मोठं आव्हान उभं पालिकेसमोर असून पालिकेच्या पी वार्डने पोलिसांना या रुग्णांचा शोध घेण्याबाबत पत्र लिहिले असल्याचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.

कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता इत्यादी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत तर काही जण अर्धवट माहिती देतात. किंवा प्रयोगशाळांतील कर्मचारी अनावधानानं चुकीची माहिती भरतात.  त्यामुळे त्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर त्याला सोधण्याचं आव्हान मुंबई महापालिका प्रशासनासमोर आहे. सध्या मालाडच्या पी वार्डात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात फैलावत आहे. अशातच या परिसरातील ७० कोरोना बाधित रुग्ण बेपत्ता झाले असून पालिकेचे अधिकारी या रुग्णांचा शोध घेत आहे. त्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांना ही पत्र लिहिले असून हे रुग्ण शोधण्याबाबत पोलिसांकडे मदत मागितली आहे.  हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण दिलेल्या पत्त्त्यावर राहत नाहीत. तर काही स्थलांतरित झाले आहेत, तर अनेकांचे फोनही बंद असल्याचे कळते.

हेही वाचाः- काम बंद असल्यामुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कसतोय शेती

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णांची नावे, त्यांनी दिलेले मोबाइलनंबर आणि आधार क्रमांकच्या माध्यमातून एक लिस्ट तयार केली असून ती पोलिसांकडे दिलेली आहे. त्यानुसार पोलिस या रुग्णांचे मोबाइल ट्रेस करून त्यांचा शोध घेण्याची शक्यता आहे. बेपत्ता रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना उपचारासाठी पून्हा रुग्णालयात नेहण्याचा प्रयत्न पोलिस करणार असल्याचे पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या