Advertisement

काम बंद असल्यामुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कसतोय शेती

सायंकाळच्या वेळी शेताला पाणी पाजल्यानंतर त्याने दिवसभरातले काम पूर्ण झाले असा मेसेज लिहिला आहे.

काम बंद असल्यामुळे ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता कसतोय शेती
SHARES

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दकीने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे चित्रपटसृष्टीत चित्रीकरणाचे काम थांबले असताना. फावल्या वेळात अभिनेता नवाज्जूदीन हा शेती करत असल्याचे दिसून आले आहे. नुकताच त्याने त्याचा  एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला आहे. त्यात नवाजुद्दीन शेती करताना दिसत आहे. सायंकाळच्या वेळी शेताला पाणी पाजल्यानंतर त्याने दिवसभरातले काम पूर्ण झाले असा मेसेज लिहिला आहे.

नवाजुद्दीन आपल्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतून काम करतो. उत्तरप्रदेशच्या एका सामान्य कुटुंबातून आलेला नवाजुद्दीनला १५ वर्षाच्या संघर्षानंतर बाॅलीवूडमध्ये नावारुपाला आला. मात्र त्याचे मन रमते ते त्याच्या जुन्याच कामात म्हणूननच लाँकडाऊनमध्ये चित्रीकरणाचे काम थांबल्यापासून नवाजुद्दीन हा त्याचा वेळ शेतात घालवत आहे. शेतात तो स्वत: शेतकऱ्यांप्रमाणे शेतातील बांध धरून  पिकांना पाणी पाजत आहे. नुकताच त्याने त्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.  त्यात सांयकाळी त्याने पिकांना पाणी पाजण्यासाठी पाठाचे तोंड मोकळे करत दिवसभराचे  काम संपल्याचा मेसेज ही लिहिला आहे.

हेही वाचाः- शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील

हौस म्हणून का असेना बऱ्याच बॉलिवूड कलाकारांकडे स्वत:ची शेतजमीन आहे आणि वेळ मिळेल तसं ते आपल्या शेतात राबतात. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीलाही शेतीची आवड आहे.  या पूर्वी ही त्याने त्याचे शेताच्या बांधावरचे फोटो सोशल मिडियावर टाकले होते. मूळचा उत्तरप्रदेशच्या बुढाणाचा असलेला नवाजुद्दीन हा गावी गेल्यानंतर आवर्जून शेतात जातो. मात्र व्यस्त कामामुळे त्याला आता जात येत नाही. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून तो मुंबईजवळ शेती घेण्याच्या प्रयत्नात होता. कसाराजवळ त्याने सुपीक शेती ही पसंद केली होती. बहुदा हा व्हिडिओ तितलाच असावा. याआधीही नवाजने स्वतः इंस्टाग्रामवर त्याची माहिती दिली होती. यामध्ये तो शेतात फावडा चालवताना दिसत होता. नवाजने देशातील शेतक-यांच्या वाईट परिस्थितीविषयी आवाज उठवला आहे. त्याने 'सीड द राइज' अभियानाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला होता.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा