Advertisement

shiv sena bhavan: शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील

शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यानं शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

shiv sena bhavan: शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव; काही दिवसांसाठी सेना भवन सील
SHARES

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील झोपडपट्टी परिसराला कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. अशातच कोरोनानं आता शिवसेना भवनात शिरकाव केला आहे. मुंबईतील दादर मधल्या शिवाजी पार्क येथील शिवसेना भवनात येणाऱ्या एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्यानं शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसैनिक कोरोनाशी लढण्यासाठी मदतकार्य करत असतात व त्यासाठी अनेकांच्या संपर्कात येतात, त्यामुळं एका शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं समजतं. निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी सेनाभवन काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच सोमवारपासून निर्जंतुकीकरणासाठी पुढचे काही दिवस शिवसेना भवनातील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काही दिवस शिवसेना भवनात येऊ नये अशी सूचना देण्यात आली आहे.

शिवसेना भवनात नुकताच पक्षाचा वर्धापन दिन साजरा झाला होता. यावेळी शिवसेना भवनात पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी होते उपस्थित होते.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी राज्यात कोरोनाचे ६१ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात ११२८ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत मंगळवारी दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६१ रुग्ण दगावले आहेत. तर २१ जून रोजी ४१ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापूर्वी २० जून रोजी रोजी एकूण १३६ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या शिवाय, मंगळवारी मुंबईत कोरोनाचे ११२८ नवीन रुग्ण आढळले आहेत.

मुंबईत रुग्णांची एकूण संख्या आता ६७ हजार ६३५ इतकी झाली आहे. मुंबईत मागील२४ तासात  करोनाचे ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या एकूण ३४  हजार ११९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

सोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली

दारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा