खाकी वर्दीतली माणुसकी, स्नेहसंमेलना ऐवजी केली अनोखी मदत

कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमिवर कुणी लाखो रुपये दिले, तर कुणी अत्यावश्यक वस्तू दिल्या, या सर्वांचीच सोशल मिडियावर जोरदार प्रसिद्धी केली जाते.  माञ मुंबईतल्या जनतेच्या रक्षणासाठी सदैव रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांनी माञ राज्यात रक्ताचा तुठवडा असल्याचेे लक्षात घेऊन रक्तदान करत अनोखी मदत केली. तर या मदतीत पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून 2005 साली पोलिस दलात भरती झालेल्या महिला पोलिसांनी ही 1 लाख 10 हजाराचा धनादेश मुख्यमंञी सहायता निधीला देत अनोखी मदत केली.

हेही वाचाः- पोलीस आयुक्तांच्या उपाय योजनेनंतर कोरोना बाधीत पोलीसांच्या संख्येत घट

कोविड 19'चा संसर्ग होण्याच्या भीतीनं रक्तदाते पुढं येत नसल्यानं गेल्या काही दिवसांपासून मुंबईत रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे.  राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊनच मुख्यमंञी उद्धव ठाकरेे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.  माञ कोविडच्या भितीने नागरिक रक्तदान करण्यासाठी पुढेे येत नाही आहेत. राज्य सरकार छोट्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ही रक्तदान कँम्प लावण्यास परवानगी दिली आहे. तर मोबाइल व्हँनद्वारे ही रक्त गोळा करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोग्य विभागाकडून फोनद्वारे नागरिकांशी संपर्क साधून त्यांना रक्तदान करण्याबाबत आवाहन केले जात आहे. माञ नागरिकांकडून त्याला सौम्य प्रतिसाद मिळत असल्याने राज्याच्या रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्य सरकारची ही गरज लक्षात घेऊन 2008 साली पोलिस भरती झालेल्या पोलिस जवानांनी दरवर्षी होणारे स्नेहसंमेलन रद्द करून त्या ऐवजी नायगाव पोलिस मुख्यालय हाँलमध्ये रक्तदान शिबिराचेे आयोजन केलेे. या शिबिरात मुंबई पोलिस दलातील 273 जणांनी रक्तदान करून पून्हा एकदा मानवतेचे दर्शन घडवून दिले. तर पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून मुंबईकरांच्या सेवेसाठी सदैव मुंबईच्या रस्त्यांवर उतरणाऱ्या महिलांंनी ही मदत करताना हात आकडता घेतलेला नाही. 2005 साली पोलिस सेवेत रूजू झालेल्या महिला पोलिसांंनी आपल्या मिळकतीतून तब्बल 1 लाख 10 हजार रुपये जमा करत, ते पैसे मुख्यमंञी सहाय्यता निधीत जमा केले.

हेही वाचाः- पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी २६३ गुन्ह्यात ८४६ जणांवर कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या