महिला कोरिओग्राफरशी गैरवर्तन केल्याप्रकरणी प्रसिद्ध कोरिओग्राफर सलमान खान उर्फ युसूफ खानविरोधात ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे ऐकण्यासाठी कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिमच्या नावानेही धमकावल्याचेही तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिस अधिक तपास करत आहेत.
तक्रारदार तरुणीने अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. आॅगस्ट महिन्यात तरुणीला सलमानचा मॅनेजर कपिल शर्माचा फोन आला होता. आॅक्टोबर २०१८ मध्ये दुबईत होणाऱ्या एका कार्यक्रमात तिला तिच्या डान्सरसह काम करण्याची संधी देणार असल्याचं सांगून ओशिवरा परिसरात भेटण्यासाठी बोलावलं. त्यावेळी घरी सोडण्याच्या निमित्ताने सलमानने आपल्याशी गैरवर्तन केलं. मात्र त्यावेळी तरुणीने त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं.
त्यानंतर तरुणी आणि तिचे सहकारी २० नोव्हेंबर २०१८ मध्ये कार्यक्रमासाठी दुबईच्या बहरीन येथे गेले असताना सलमान आणि त्याच्या भाऊ रजाक याने त्यावेळीही गैरवर्तन करत दाऊदच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी तरुणीने तिच्या वकिलांच्या मदतीने ३० जानेवारी रोजी ओशिवरा पोलिसात सलमान आणि त्याचा भाऊ रजाक विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी ३५४,५०६,३४ भा.द.वि नुसार गुन्हा नोंदवला अाहे.
हेही वाचा -
सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
तेलतुंबडेंना मुंबई विमानतळावर अटक