Advertisement

सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे


सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेगाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
SHARES

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल सध्या प्रवाशांसाठी डेथलाईन बनत चालली आहे. लोकल प्रवास करताना डब्यात मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. लोकल डब्यातील या गर्दीचा फायदा घेत अनेक गर्दुल्ले आणि चोर प्रवाशांचे मोबाइल, पाकीट आणि मौल्यवान वस्तू चोरतात. त्यामुळं आपल्या कमाईच्या वस्तू वाचवण्यासाठी प्रवाशी चोरांचा पाठलाग करतात आणि यातच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो.  त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकलच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या २५ आणि पश्चिम रेल्वेच्या ४ लोकलमधील ५० डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.


आयसीएफतर्फे सीसीटीव्ही

लाखो मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी मुंबईतील लोकल गाड्यांच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार लोकलच्या पुरुष डब्यांमध्ये ४ आणि महिला डब्यांमध्ये ६ सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर १२ डब्यांच्या २७३ लोकलमधील डब्यांची संख्या ३,२७६ इतकी असून आहे. यामधील मध्य रेल्वेच्या २५ लोकलमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यातील १० लोकलमधील सीसीटीव्ही मध्य रेल्वे मुख्यालयाने बसविले आहेत. तर, बाकी १५ लोकलमधील सीसीटीव्ही आयसीएफतर्फे बसविण्यात आले आहेत. तसंच पश्चिम रेल्वेवरील ४ लोकलमधील ५० डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवले अाहेत. 



हेही वाचा -

ट्रायची नवी नियमावली लागू, ग्राहक मात्र अजूनही संभ्रमात

निवडणूकीच्या तोंडावर मोदींनी केलं मध्यमवर्गीयांना खुश, ५ लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा