Advertisement

ट्रायची नवी नियमावली लागू, ग्राहक मात्र अजूनही संभ्रमात

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) ने ग्राहकांना टीव्ही वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या ट्रायच्या नव्या नियमावलीच्या अमलबजावणीला १ फेब्रुवारी शुक्रवारपासून संपुर्ण राज्यभरात सुरुवात झाली आहे. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार ग्राहकांना पसंतीच्या वाहिन्या निवडच्या असून तेवढेच शुल्क भरण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

ट्रायची नवी नियमावली लागू, ग्राहक मात्र अजूनही संभ्रमात
SHARES

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) ने ग्राहकांना टीव्ही वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. या ट्रायच्या नव्या नियमावलीच्या अमलबजावणीला १ फेब्रुवारी शुक्रवारपासून संपुर्ण राज्यभरात सुरुवात झाली आहे. ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार ग्राहकांना पसंतीच्या वाहिन्या निवडच्या असून तेवढेच शुल्क भरण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. दरम्यान, ट्रायने हा नवा नियम लागू करण्यासठी ग्राहकांना ३१ जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली होती. मात्र, अजूनही ग्राहकांनी वाहिन्यांची निवड केलेली नाही आहे. त्यामुळं या ग्राहकांना नव्या नियमानुसार निशुल्क (फ्री टू एअर) वाहिन्याच पाहता येणार आहेत.


ग्राहकांमध्ये अजूनही संभ्रम

टीव्ही वाहिन्यांची वाढती संख्या व त्यानुसार वाढत असलेले केबल, डीटीएचचे शुल्क यावर उतारा म्हणून ‘ट्राय’ने ही नवीन नियमावली लागू केली आहे. मात्र वाहिन्यांची निवड केली नाही तर, १ फेब्रूवारीपासून टीव्ही बंद होणार असा संभ्रम सर्व ग्राहकांनमध्ये होता. परंतू ‘ट्राय’ने तसे करण्यास मज्जाव केला आहे. ज्या ग्राहकांनी सशुल्क वाहिन्यांची निवड केलेली नाही त्यांनी शुक्रवारपासून निशुल्क वाहिन्याच (फ्रि टू एअर) पाहता येणार आहेत. त्यामुळं या ग्राहकांनी लवकरात लवकर आपल्या पसंतीच्या वाहिन्यांची निवड करून, केबल किंवा डीटीएच ऑपरेटरशी संपर्क साधावा, असे आवाहन ट्रायने केले आहे.


ट्रायची नवी नियमावली


  • ग्राहकांना किमान १०० वाहिन्या निवडण्याचे बंधन असून त्यासाठी त्यांना १३० रुपयांचे नेटवर्क शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना १३० रुपये + २४ रुपये असे एकूण शुल्क १५३ रुपये मोजावे लागणार आहेत.
  • १०० वाहिन्यांमध्ये ग्राहकांना २५ दूरदर्शन वाहिन्या निवडणे बंधनकारक असणार आहे.
  • उर्वरीत वाहिन्यांची निवड निशुल्क (फ्री टू एअर-एफटीए) किंवा सशुल्क एसडी वाहिन्यांमधून करता येणार आहे.
  • या मुलभूत पॅकेजमध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक एचडी वाहिनी दोन एसडी वाहिनीइतकी गणली जाणार आहे.
  • या १०० वाहिन्यांपुढे ग्राहकाने निवडलेल्या प्रत्येक २५ अतिरिक्त वाहिन्यांमागे २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • ग्राहकाला हव्या तितक्या वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. मात्र, त्यानुसार त्याला पैसे मोजावे लागणार आहेत.
  • ग्राहकांनी एकदा निवडलेली वाहिनी रद्द करण्याचा अधिकार देखील देण्यात आला आहे.



हेही वाचा -

अर्रर्रर्र! वाॅटरटॅक्सीची प्रतिक्षा लांबली, तांत्रिक अडचणींचा फटका

बी.कॉम सत्र ५ चा निकाल जाहीर, ५७ टक्के विद्यार्थी पास



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा