बी.कॉम सत्र ५ चा निकाल जाहीर, ५७ टक्के विद्यार्थी पास

बीकॉमच्या परीक्षेत ५७ हजार १६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ५६ हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ३१ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या निकालाची टक्केवारी ५७.११% टक्के इतकी आहे.

SHARE

मुंबई विद्यापीठानं ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या हिवाळी सत्र परीक्षांचे निकाल लावण्यास सुरूवात केली असून बुधवारी ३० जानेवारी रोजी तृतीय वर्ष बी.कॉम सत्र पाचचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत ५७ हजार १६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील ५६ हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील ३१ हजार ९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या निकालाची टक्केवारी ५७.११% टक्के इतकी आहे. दरम्यानं बुधवारी एकूण ७ निकाल जाहीर करण्यात आला आहेत. त्यानुसार आतापर्यंत १०३ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ५ ही परीक्षा मुंबईसह, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यात घेण्यात आली असून व्यक्तिरिक्त राज्याबाहेरील सिल्व्हासा या केंद्रशासित प्रदेशातील एक परीक्षा केंद्र असे एकूण २३६ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली होती.


निकाल पाहणे आणखी सोप

मुंबई विद्यापीठानं नुकत्याच जाहीर केलेल्या बी कॉम सत्र ५ च्या निकाल विद्यापीठाच्या www.mumresults.in या स्वतंत्र वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे. या वेबसाईटवर सर्व विद्यार्थ्यांच्या आसन क्रमांकानुसार स्वतंत्र फाईल्स तयार करण्यात आल्या असून यामुळं विद्यार्थ्यांना निकाल पाहणे सोप होणार आहे.


२,२५,२२३ उत्तरपत्रिका, ४,११६ शिक्षक

मुंबई विद्यापीठाकडे तृतीय वर्ष बी कॉम परीक्षेमध्ये चार विषयाच्या तपासणी २ लाख २५ हजार २२३ उत्तरपत्रिका दाखल झाल्या होत्या. या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी ४ हजार ११६ शिक्षकांद्वारे करण्यात आली असून एकूण ५१ हजार ९२९ उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. दरम्यान या सर्व उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन व मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग (OSM) पद्धतीने करण्यात आलं आहे.


प्रश्नपत्रिका १०० गुणांची

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बी.कॉम अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली असून अभ्यासक्रमदेखील सुधारण्यात आला आहे. या परीक्षेपासून तृतीय वर्ष बी.कॉम सत्र ५ व ६ साठी सहा विषय करण्यात आले असून या परीक्षेची प्रश्नपत्रिकाही १०० गुणांची करण्यात आली आहे. तसेच यावर्षी प्रथमच बीकॉम सत्र ५ मध्ये पेपर नं.५ व ६ मध्ये क्षमता संवर्धन अभ्यासक्रमाचे (Ability Enhancement Course) दोन विषय आहेत. या दोन्ही विषयांचे मुल्यांकन कॉलेजांमार्फत करण्यात आले आहेत.


बीकॉम सत्र ५ चा निकाल हा मुंबई विद्यापीठाच्या दृष्टीने महत्वाचा असून कॉलेजांच्या प्राचार्यांनी मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिल आहे. त्याशिवाय सर्व शिक्षकांनी मूल्यांकन केल्यानं विद्यापीठाचे विविध निकाल जाहीर करणं शक्य होत आहे.


- डॉ. सुहास पेडणेकर,कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

बीकॉमच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी संख्या मोठी असल्यानं निकाल अचूक लावण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. त्याशिवाय मूल्यांकनामध्ये तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून अनेक बाबींची दक्षता घेण्यात आली होती.


- डॉ. विनोद प्र. पाटील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळहेही वाचा -

अब की बार 'बेरोजगारी' की मार, बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यांवर

एकाच वेळी जुळ्या बोगद्यातून दोन टीबीएम मशीन पडल्या बाहेरसंबंधित विषय
ताज्या बातम्या