झायरा वासिम विनयभंग प्रकरणी आरोपीसाठी पोलिस कोठडीची मागणी

'दंगल'फेम झायरा वासिमने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या विकास सहदेवची १४ दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. विस्तारा कंपनीच्या विमानामध्ये बिझनेस क्लासमध्ये प्रवास करत असताना विकास सहदेवने आपला विनयभंग केल्याची तक्रार झायरा वासिमने केली होती.

रविवरी म्हणजेच १० डिसेंबरला मुंबई पोलिसांनी ३९ वर्षीय विकास सहदेवला अटक केली होती. विकास हा एंटरटेन्मेंट मीडिया कंपनी असलेल्या सन ग्रुपचा सीनिअर एक्झिक्युटिव्ह आहे. विकासविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झायरा वासिमच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे

  • आरोपीला १४ दिवसांची पोलिस कस्टडी मिळावी
  • त्यातून त्याच्या नैतिक पार्श्वभूमीची माहिती मिळेल
  • आरोपी वारंवार गुन्हा करतो की नाही हे कळेल
  • त्याचा जबाब नोंदवता येईल
  • त्याने सादर केलेली कागदपत्रं तपासता येतील
  • आरोपी फिर्यादीला इजा पोहोचवण्याची शक्यता आहे

विकास सहदेवच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे

  • झायरा वासिमची तक्रार ही पूर्ण विचाराअंती केलेली आहे. एअरपोर्ट स्टाफकडे तक्रार न करता दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये तक्रार केली
  • ही तक्रार म्हणजे पब्लिसिटी स्टंट आहे
  • ऑक्टोबरमध्ये झायराने वयाची १७ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे ती जवळजवळ १८ वर्षांची आहे. तिला अल्पवयीन म्हणता येणार नाही
  • विकास त्याच्या काकांचे मृत्यूपश्चात विधी करून आला होता. तो दु:खी मानसिकतेत होता
  • या प्रकरणात पॉक्सो कायदा लागू होऊ शकत नाही. कारण, पॉक्सोमध्ये शरीराच्या विशिष्ट भागांना स्पर्श केला, तरच गुन्हा दाखल होऊ शकतो
  • जर फिर्यादीचा २ तासांच्या विमान प्रवासात विनयभंग केला जात होता, तर तिने फ्लाईट क्रूकडे तक्रार का केली नाही?
  • फिर्यादीने तिच्या आईला का नाही कळवलं?
  • पोलिस तक्रारीमध्ये अनेक गोष्टी नंतर समाविष्ट करण्यात आल्या
  • विकासने हे जाणून बुजून केलं नाही. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्याच्या लग्नाला १२ वर्ष झाली असून त्याला ९ वर्षांचा मुलगाही आहे.

या प्रकरणी पुढील सुनावणी १३ डिसेंबरला होणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या