झायरा वसिम छेडछाडप्रकरणी आरोपीला अटक


झायरा वसिम छेडछाडप्रकरणी आरोपीला अटक
SHARES

'दंगल' गर्ल झायरा वसिम रविवारी एअर विस्ताराच्या विमानातून दिल्लीहून मुंबईला येत असताना तिच्यासोबत छेडछाडीची घटना झाली होती. या प्रकाराबाबत तीने इन्स्टाग्रामवर लाइव्ह प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आरोपी विकास सचदेव याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे. विकास हा मुंबईतील एका एन्टरटेन्मेंट मीडिया कंपनीत वरिष्ठ कार्यकारी पदावर कार्यरत आहे.पत्नीने आरोप फेटाळले

आरोपी विकासला अटक होताच त्याची पत्नी दिव्या हिनं पतीवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दिव्या म्हणते 'झायरा हिनं आपल्या प्रसिद्धीचा फायदा घेत माझ्या पतीला चुकीच्या पद्धतीनं आरोपी बनवलं आहे. मामांचं निधन झाल्यानं विकास दिल्लीला गेला होता. तो दिल्लीहून मुंबईला येत होता. तो फार दु:खी होता. त्याला थंडी वाजत होती, म्हणून तो ब्लँकेट मागत होता. पण झायरानं माझ्या पतीवर केलला आरोप धक्कादायक आहे'. पुढे काय म्हणाली दिव्या?

'सोमवारी सकाळी पोलिसांनी माझ्या पतीला अटक केली. झायराने 'ती' घटना घडली तेव्हा विमानातील अलार्म का नाही वाजवला? तीने त्याच वेळी ट्विट का केलं नाही? २ तासानंतर ट्वीट का केलं? झायराच्या सोबतीला तीची आईदेखील होती. त्यावेळी या दोघींनी आवाज का नाही केला? आम्हाला ९ वर्षांचा एक मुलगा देखील आहे. त्यामुळे माझा पती कोणत्याही महिलेसोबत अशा प्रकारे गैरवर्तन करूच शकत नाही'.

संबंधित विषय