महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या दिल्ली प्रतिनियुक्तीची चर्चा

मागील अनेक दिवसांपासून अधून मधून महाराष्ट्र पोलिस महासंचालकांच्या दिल्ली प्रतिनियुक्तीच्या चर्चा रंगत असताना. आता पून्हा एकदा या चर्चेला उधान आले आहे. तसे झाल्यास राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिका-यांमध्ये मोठ्याप्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी आतापासूनच काही जणांनी  जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे कळते.

हेही वाचाः- मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आदित्य ठाकरेंना आव्हान

महाराष्ट्र पोलिस दलाचे माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्या निवृत्तीनंतर त्या जागी भारतीय पोलीस सेवेतील १९८५ च्या बॅचचे अधिकारी सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. जयस्वाल हे पूर्वी दिल्लीत ‘रॉ’ एजन्सीमध्ये कार्यरत होते. त्यातच २०१९ मध्ये  झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी बनवून राज्यात सरकार बनवले.  त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीतून जयस्वाल यांना केंद्रीय यंत्रणेवर प्रतिनियुक्तीबाबत हिरवा सिग्नल मिळाला होता.मात्र जयस्वाल यांनी त्यावेळी नकार दिला होता.मात्र कोरोना काळात राज्य सरकारने जीआर काढून १५ टक्के बदल्याना परवानगी दिली. मात्र जयस्वाल यांचे कोरोना काळात बदल्यांबाबत वेगळे मत होते. याची चर्चा देखील रंगली होती.  अशातच जयस्वाल यांनी केंद्रात जाण्यासाठी  पुन्हा राज्य सरकारकडे परवानगी मागितली असल्याचे कळते. त्याला राज्या सरकारने परवानगी दिल्याचे कळते.

हेही वाचाः- अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं

जयस्वाल यांच्या दिल्लीत जाण्याने महाराष्ट्र पोलिस महासंचालक या महत्वपूर्ण पदासाठी पोलिस दलातील बड्या अधिकाऱ्यांमध्ये आता पून्हा लाँबिग सुरू झाली आहे. रिक्त होणा-या जागेसाठी संजय पांडे, बिपीन बिहारी, हेमंत नगराळे, सुरेंद्र पांडे, कनकरत्म आणि रजनिश सेठ या संभाव्य नावाचा विचार केला जात आहे.  त्यातही  संजय पांडे, नगराळे आणि रजनिश सेठ यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत. मात्र  संजय पांडे यांचे नाव या स्पर्धेत काहीसे आघाडीवर मानले जाते. या बदलानंतर राज्यात मोठ्याप्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही महत्त्वाच्या शहरांमधील पोलिस आयुक्त पदांवरही नवे अधिकारी येण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या