'ते' करायचे शार्क माशाच्या कातडीची तस्करी!

शार्क माशाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या पाच जणांना महसूल गुप्तचर संचालनालया (डीआरआय)ने अटक केली आहे. या पाचही आरोपींकडून 'डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी तब्बल ८ हजार किलो शार्क माशांची कातडी हस्तगत केली आहे. ही कातडी गुजरातहून आणण्यात आल्याचं पुढे आलं आहे.

कुठे मागणी?

'शार्क टेल' अर्थात शार्क माशांच्या पंखाला चीन, हाँगकाँग इत्यादी देशात शार्क माशांच्या पखांना मोठी मागणी असते. या पंखापासून बनवण्यात येणाऱ्या सूपमुळे सांधेदुखी तसंच इतर व्याधींपासून मुक्ती मिळते, असा समज असल्याने परदेशात या पंखाना मोठी मागणी असते.

शिवडीत छापा

गुजरातमधून आणण्यात आलेले हे पंख शिवडीतील बंदरांच्या गोदामात लपवून ठेवण्यात आल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी गोदामावर छापा टाकत, गोण्यांमध्ये लपवून ठेवलेली कातडी ताब्यात घेतली. बाजारात एका शार्क माशांच्या पंखाची किंमत १०० डाॅलर इतकी म्हणजे अंदाजे ७ हजार इतकी आहे.

मागील अनेक दिवसांपासून ही तस्करी सुरू असून डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपींचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे.


हेही वाचा-

अखेर शरद कळसकरचा ताबा सीबीआयकडे

कोरेगाव-भीमा हिंसाचार: पत्रकार परिषद घेतलीच कशी? पोलिसांना न्यायालयाने खडसावलं


पुढील बातमी
इतर बातम्या