गुजरात ड्रग्सचं महाराष्ट्र कनेक्शन, एकाला अटक

गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा मोठा साठा हस्तगत करण्यात आलाय. गुजरातमधील द्वारकाच्या खंभालिया परिसरात तब्बल साडे तीनशे कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. ज्यात हेरॉईन आणि एमडी ड्रग्जचा समावेश आहे. यापूर्वी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर जवळपास तीन हजार किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

गुजरातमधील स्थानिक पोलिसांनी जवळपास १६ किलो हेरॉईन जप्त केलं आहे. हेरॉईनसोबत ६६ किलो मेफेड्रोन ड्रग्जही पकडण्यात आलं आहे. याची किंमत जवळपास ३५० कोटी रुपये असल्याचं समजतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज पाकिस्तानमधून समुद्राच्या मार्गे येत होतं. याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड मारत ड्रग्ज जप्त केलं.

सज्जाद घोसी, सलीम कारा आणि अलीभाई कारा या तिघांना गुजरात पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यातील सज्जाद हा ठाण्यातील मुंब्र्याचा रहिवासी आहे. सज्जाद हा भाजीपाल्याचा विक्रेता असल्याचं समोर आलं आहे.

स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत विविध प्रकराचं ड्रग्ज होतं. शहजाद याच्याकडून ६.१६८ किलो मेथामफेटामायन (एमडी ड्रग) आणि ११.४८ किलो हेरॉईनचा समावेश आहे. याची एकूण किंमत ८८,२५,५०,००० इतकी असल्याचं समजतेय.

शहजादशिवाय सलीम कारा आणि अली कारा यांच्याकडूनही ड्रग्जची ४७ पॅकेट्स जप्त करण्यात आली. याची किंमत २३५ कोटींच्या आसपास असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा

परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरं अजामीनपात्र वॉरंट जारी

पुनम पांडे रुग्णालयात दाखल, पती खातोय तुरुंगाची हवा

पुढील बातमी
इतर बातम्या