पुनम पांडे रुग्णालयात दाखल, पती खातोय तुरुंगाची हवा

पूनम पांडेच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.

पुनम पांडे रुग्णालयात दाखल, पती खातोय तुरुंगाची हवा
SHARES

अभिनेत्री पूनम पांडेचा (Poonam pandey) पती सॅम बॉम्बे याला मुंबई पोलिसांनी अटक (Sam Bombay Arrest) केली आहे. पूनम पांडेनं तिच्या पतीविरोधात मारहाण आणि घरगुती हिंसाचाराचा (Beating and domestic violence) आरोप केला आहे.

मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला अटक केली आहे.

पूनमनं आपल्या तक्रारीत म्हटलं की, सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. याचा राग आल्यानं सॅमनं रागाच्या भरात पूनमचे केस पकडून तिला ओढलं. तसंच तिचं डोकं भिंतीवर आपटल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे.

एवढंच नाही तर सॅमनं पूनमच्या चेहऱ्यावर ठोसा मारला आहे. त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमा झाल्या आहेत. सॅमनं केलेल्या मारहाणीत पूनम पांडेच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पूनम पांडे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

पूनम पांडेच्या तक्रारीनंतर आता वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बेला अटक केली आहे. वांद्रे पोलिसांनी सोमवारी संध्याकाळीच सॅमला अटक केली असून संबंधित प्रकरणाचा तपास केला जात आहे.

याआधीही पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. सप्टेंबर २०१९ मध्ये पूनमनं गोव्यात सॅम बॉम्बे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये सॅम बॉम्बे आणि पूनम पांडे विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या अवघ्या १२ दिवसानंतरच पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे यांच्यातील वादाचं प्रकरण समोर आलं होतं.

यापूर्वी पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात छेडछाड, धमकी आणि मारपीट करण्याचा आरोप केला होता. पूनम पांडेच्या तक्रारीनंर गतवर्षीही गोवा पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली होती. त्यानंतर जामीनावर सॅम बॉम्बे बाहेर आला होता.

अश्लील व्हिडीओप्रकरणी पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला विंगनं कॅनकोना पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. यामुळे व्हिडीओच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पूनम पांडे कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्यात आलं होतं.



हेही वाचा

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ, टॅक्सी चालकानं...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा