मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ, टॅक्सी चालकानं...

इमारतीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ, टॅक्सी चालकानं...
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एका टॅक्सी चालकानं मुंबई पोलिसांना संभाव्य धोक्याची माहिती दिल्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

इमारतीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

"आम्हाला एका टॅक्सी चालकाचा फोन आला. त्यानं माहिती दिली की, दोघा अनोळख्या व्यक्तींनं  मुकेश अंबानी यांचं निवासस्थान अँटिलियाबद्दल विचारलं. पत्ता विचारणा-या दोघांच्या हातात एक मोठी बॅग होती, त्यानंतर टॅक्सी चालकानं तत्काळ मुंबई पोलिसांना याबाबत माहिती दिली," असं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं.

चालक आझाद मैदान पोलीस ठाण्यात असून तिथं त्याचा जबाब नोंदवला जात आहे.

या वर्षी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील अँटिलियाजवळ एक बेवारस  स्कॉर्पिओ पार्क केलेली आढळली होती.  पोलिसांना नंतर अंबानी कुटुंबाच्या मालकीच्या वाहनांपैकी एका वाहनाच्या नंबर प्लेटसह गाडीच्या आतून जिलेटिनच्या काठ्या आणि धमकीची नोट जप्त केली होती.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा