नवी मुंबईत महिलेला जाळून दिला गळफास

नवी मुंबईत (navi mumbai) एका महिलेला (woman) जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पाच आरोपींनी महिलेला पेटवल्यानंतर तिला गळभास लावला. यामध्ये महिलेचा मृत्यू (death) झाला. शारदा माळी (sharda mali) (५५) असं मृत महिलेचे नाव आहे. पनवेल (panvel) मधील दुंद्रे गावात ही घटना घडली. अलका गोपाळ पाटील (४५), वनाबाई अर्जुन दवणे (६०), गोपाळ विट्ठल पाटील (४८), हनुमान भगवान पाटील (४२), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे.

वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये महिलेवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची घटना ताजी असताना आता नवी मुंबईत (navi mumbai) घडलेल्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पनवेल (panvel) पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पाच फरार आरोपींचा शोध घेत आहेत. चोरीच्या आरोपावरुन महिलेची हत्या (murder) केल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी शेजारच्यांनी महिलेवर मंगळसूत्र चोरीचा आरोप केला होता. त्यावरून मोठा वादही त्यावेळी झाला होती. त्यानंतर हे प्रकरण मिटलं होतं.

मात्र, गुरूवारी सकाळी शेजारील ५ जण महिलेच्या घरात घुसले. तिला आधी पेटवण्यात आले. मात्र, दुर्गंधी पसरल्याने तिला गळफास लावून लटकवण्यात आलं. यात तिचा मृत्यू (death) झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र शारदा यांची अवस्था पाहता त्यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर फासावून लटकवून हत्या केल्याचा आरोप त्यांची मुलगी आणि पतीने केला आहे. राज्यात चार दिवसांत महिलेला जाळून मारण्याची तिसरी घटना घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा -

अखेर पीटर मुखर्जीला जामीन मंजूर, पण...

दारूच्या नशेत त्याने स्वतःचा गळा चिरला


पुढील बातमी
इतर बातम्या