‘तारक मेहता का...’ मालिकेतील अभिनेत्रीची शो निर्माताविरोधात तक्रार

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही मालिकेच्या माजी अभिनेत्रीने मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्रीने शोचे निर्माते असित कुमार मोदी आणि ऑपरेशन हेड सोहिल रमाणी आणि त्याचा सहाय्यक जतिन बजाज यांच्यावर लैंगिक आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी तक्रार अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही शोच्या माजी अभिनेत्रीने यूट्यूबवर तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. एका व्हिडिओमध्ये तिने आरोप केला आहे की, ऑपरेशन्सचे प्रमुख सोहिल रमाणी आणि त्याचा सहाय्यक जतीन बजाज यांनी तिचा अपमान केला आणि 7 मार्च रोजी तिला सेटवरून त्वरित निधून जाण्यास सांगितले. 

शोमधून काढून टाकल्यानंतर तिने कायदेशीर प्रतिनिधीत्व मागितले आहे आणि शोच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या तिघांवर लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत अभिनेत्रीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्याच्या आरोपांच्या आधारे आता अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

पुढील तपासासाठी ही तक्रार पवई पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. सध्या अधिकारी या आरोपांची तांत्रिक तपासणी करत आहेत. आतापर्यंत, या प्रकरणाच्या संदर्भात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आलेला नाही. पोलिस तक्रारीचा तपास सुरू ठेवतील आणि तपासातील निष्कर्षांवर आधारित योग्य ती कारवाई करतील.


हेही वाचा

सीबीआयने समीर वानखेडेंना समन्स बजावला

बॉडीबिल्डरचा आई वडिलांवर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक

पुढील बातमी
इतर बातम्या