ठाण्यामध्ये एका बॉडीबिल्डरने आपल्या आई वडिलांवर प्राणघातक हल्ला केला आहे. विहंग व्हॅली, कासारवडवली, घोडबंदर रोड ठाणे पश्चिम येथे सकाळी 11.15 च्या सुमारास ही घटना घडली. 35 वर्षीय मुलाने वडिलांवर आणि आईवर वार केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
कासारवडवली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी म्हणाले, "संकल्प भाटकर नावाच्या 35 वर्षीय व्यक्तीने गुरुवारी सकाळी वडिलांवर आणि आईवर चाकूने वार केले. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हा बॉडी बिल्डर असून तो स्टेरॉईड्स घेत असे. तो सायको आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बाबशेट्टी पुढे म्हणाले, "आरोपी संकल्प भाटकर त्याच्या आई आणि वडिलांना भोसकून कापूरबावडीकडे MH-04- HL- 1489 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून निघाला. त्याच्यासोबत कांदा कटर आहे. आम्ही लोकांना आवाहन करतो की, जर आरोपी भाटकर कुठेही दिसल्यास कासारवडवली पोलिसांना त्वरित कळवावे.
हेही वाचा