एकाच नंबरच्या दोन नोटा ? व्यापाऱ्यांना ८० लाखाला गंडवले

अनेक चित्रपटामध्ये अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिस आरोपींना जाळ्यात अडकवण्यासाठी ज्या पद्धतीने बनावट नोटांचे बंड्डल वापरले जातात. अशाच बंड्डलचा वापर करून मुंबईतील अनेक मोबाइल विक्रेत्या व्यापाऱ्यांना तब्बल ८० लाखांना गंडा घालण्यात आल्याचाप्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आनंदकुमार तिवारी ऊर्फ अतुल असे या आरोपीचे नाव असून पोलिस त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. त्याने अशा प्रकारे कोलकाता, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्रात अनेक व्यापारी, व्यावसायिकांना निम्म्या किमतीत चलनी नोटा विकण्याचे आमीष दाखवत फसवल्याचे चौकशीत पुढे आले आहेत. 

हेही वाचाः- ​बर्वेंनी केलेल्या बदल्या, नव्या आयुक्तांनी आल्या आल्या थांबविल्या !​​​

एकाच नंबरच्या दोन नोटा केंद्र सरकारने छापल्या असून त्यातील एका नंबरच्या नोटा आपल्याकडे आहेत. तर दुसऱ्या नोटा चलनात आधीच आल्या असल्याचे तिवारी सांगायचा. दोन हजार रुपयांचे मूल्य असलेल्या हव्या तितक्या नोटा उपलब्ध करून देऊ, मात्र त्यासाठी अर्धी किंमत (५०० व १०० मूल्य असलेल्या नोटा) द्याव्या लागतील, असे सांगत. मुंबईत मोबाइल विक्रीचा व्यवसाय करणारा व्यावसायिक या टोळीच्या संपर्कात आला. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील एका प्रसिद्ध, तारांकित हॉटेलमध्ये टोळीने या व्यावसायिकाची भेट घेतली. टोळीचा म्होरक्या तिवारी याने व्यावसायिकाला स्वत:कडील दोन हजार मूल्य असलेल्या पाच नोटा दिल्या. या नोटा ‘सेकंड सीरिज’च्या आहेत, या नोटा कोणालाही संशय न येता सहज चालनात येतील, हवे तर खातरजमा करून पाहा, असे सुचवले. व्यावसायिकानेही त्या सहजरीत्या वठवल्या.

हेही वाचाः- ‘जीएसटी’सहीत पक्के बिल दाखवा आणि एक कोटी जिंका

तिवारीवर विश्वास बसल्याने व्यावसायिकाने सेकंड सीरिजच्या, दोन हजार रुपये मूल्य असलेल्या आठ हजार नोटांची (एक कोटी ६० लाख रुपयांची) मागणी केली. या नोटा विकत घेण्यासाठी व्यावसायिकाने ८० लाख रुपये गोळा केले. व्यवहार सुरू झाला आणि तितक्यात तिवारी व त्याच्या साथीदारांनी एटीएसचा छापा पडला, असा कांगावा करत घाईघाईत व्यावसायिकाच्या हाती नोटांची बंडले दिली आणि तेथून पळ काढला. व्यावसायिकाने बंडले तपासली तेव्हा त्यात वरची आणि तळाची नोट वगळता उर्वरित कोरे कागद होते.ही टोळी गोरेगाव येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दडल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सातरस्ता कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय निकुंबे यांना मिळाली. त्यानुसार सहायक निरीक्षक संतोष साळुंखे, गणेश केकाण, उपनिरीक्षक अतीश लोहकरे, अंमलदार हृदयनाथ मिश्रा आणि पथकाने तिवारीसह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. अशी माहिती गुन्हे शाखेचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या