बर्वेंनी केलेल्या बदल्या नव्या आयुक्तांनी आल्या आल्या थांबविल्या !

या बदल्यांमध्ये अनियमिततेचा संशय आल्याने मुंबईचे नवे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पहिल्याच दिवशी स्थगिती दिली

बर्वेंनी केलेल्या बदल्या नव्या आयुक्तांनी आल्या आल्या थांबविल्या !
SHARES

मुंबईचे मावळते पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी निवृत्तपूर्वी केलेल्या काही अधिकाऱ्यांच्या बदलीवर स्थगिती आणण्यात आली आहे. नवे आयुक्त परमवीर सिंह यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देत जैसे थे चे आदेश दिले असल्याचे समजते.

निवृत्तीपूर्वी (27 फेब्रुवारी) संजय बर्वे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आदी 31 पोलीस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या होत्या. परंतु या बदल्यांमध्ये अनियमिततेचा संशय आल्याने मुंबईचे नवे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पहिल्याच दिवशी स्थगिती दिली आहे. प्रशासन विभागाचे सहपोलीस आयुक्त नवल बजाज यांनी आज स्थगितीचा आदेश परिपत्रकाद्वारे जारी केल्याने साऱया मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली असून ज्या अधिकाऱयांनी मध्यस्थाला गाठून आपणास मोक्याची व क्रीम पोस्टिंग मिळावी म्हणून प्रयत्न केले होते त्या पोलीस अधिकाऱयांना मोठा धक्का बसला आहे.


निवृत्तीपूर्वीच करण्यात आलेल्या या बदल्यांवर अनेकांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला होता. एका खासदारानेही याबाबत आरोप केले आहेत. त्यानंतर शासनाने गंभीर दाखल घेत त्वरित अधिकारी यांच्या बदल्यानं स्थगिती देण्यात यावरी असे परिपत्रक काढले. सादर परिपत्रकानुसार नवे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी बदल्याना स्थगिती दिली.जो पर्यंत शासनाचे पुढील आदेश प्राप्त होत नाही तो पर्यंत कुठल्याही चार्ज सोडू नये जैसे थे राहणायचे आदेश आयुक्त परमवीर सिंह यांनी दिले.

सह पोलिस आयुक्त प्रशासन नवल बजाज यांची स्वाक्षरी असलेले हे पत्र बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे मुंबई पोलिस दलातील सर्व विभागांना पाटवण्यात आले असून त्यात पुढील आदेश येईपर्यंत या नेमणूक, पदोन्नती, जिल्हा बदली याबाबत प्रसिद्धचझालेले आदेशाला स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असल्याचे समजते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा