१९९३ च्या मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपीला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • क्राइम

मुंबईत १९९३ रोजी झालेल्या बाॅम्बस्फोटातील आणखी एका आरोपीला गुजरात दहशतवाद विरोधी पथका (एटीएस)ने अटक केली आहे. अहमद मोहम्मद लंबू असं या आरोपीचं नाव आहे. एटीएसने लंबू याला राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील धारिया भागातून अटक केली आहे.

आधी टकलाला अटक

याअगोदर काही महिन्यांपूर्वीच मुंबई बाॅम्बस्फोट खटल्यातील आणखी एक आरोपी यासीन मन्सूरी मोहम्मद फारूक ऊर्फ टकला याला अटक करण्यात आली होती. स्फोटांच्या अगोदर आणि नंतर या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी देशाबाहेर पळून गेले होते, त्या सर्वांना मदत केल्याचा आरोप टकलावर आहे. टकलाला यूएईतून प्रत्यार्पणाद्वारे ताब्यात घेण्यात आलं होतं.

तर फरार आरोपींपैकीच एक असलेल्या लंबू याला झालेली अटक महत्त्पूर्ण मानण्यात येत आहे. लंबू याला सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

सुनावणी सुरू

१२ मार्च १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या १२ बॉम्बस्फोटात २५७ जण ठार झाले होते, तर ७१३ जण जखमी झाले होते. टाडा विशेष कोर्टात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून गेल्या वर्षी विशेष टाडा न्यायालयाने दोघांना फाशीची शिक्षा सुनावली. तर, अबू सालेमसह एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.


हेही वाचा-

१९९३ बाॅम्बस्फोटातील 'टकला' मुंबई पोलिसांच्या ताब्यात

दाऊदच्या मुंबईतील साम्राज्याला जबरदस्त हादरा!


पुढील बातमी
इतर बातम्या