१९९३ बाॅम्बस्फोटातील 'टकला' मुंबई पोलिसांच्या ताब्यात

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस फारूख टकलाकडे बघत आहेत. स्फोटांच्या पूर्वी आणि नंतर या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी देशाबाहेर पळून गेले होते, त्या सर्वांना मदत केल्याचा आरोप टकलावर आहे. बॉम्ब बनवण्याच्या तसंच अत्याधुनिक शस्त्रास्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी आरोपींना विनाचौकशी दुबईहून कराचीला पाठविण्याचं कामही त्याने केलं होतं.

१९९३ बाॅम्बस्फोटातील 'टकला' मुंबई पोलिसांच्या ताब्यात
SHARES

जे. जे. रुग्णालयात १९९२ मध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यासीन मन्सूरी मोहम्मद फारूक ऊर्फ टकला (५७) याचा सीबीआयकडून गुरूवारी ताबा घेतला. न्यायालयाने त्याला २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती उपायुक्त (गुन्हे) दिलीप सावंत यांनी दिली. गेल्या महिन्यात १९९३ मधील स्फोटांमधील सहभागाप्रकरणी त्याला यूएईमधून अटक करण्यात आली होती.

काय आहेत आरोप?

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलिस फारूख टकलाकडे बघत आहेत. स्फोटांच्या पूर्वी आणि नंतर या प्रकरणातील जे प्रमुख आरोपी देशाबाहेर पळून गेले होते, त्या सर्वांना मदत केल्याचा आरोप टकलावर आहे. बॉम्ब बनवण्याच्या तसंच अत्याधुनिक शस्त्रास्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी आरोपींना विनाचौकशी दुबईहून कराचीला पाठविण्याचं कामही त्याने केलं होतं.

पोलिसांचा मृत्यू

जे. जे. रुग्णालयातील गोळीबार प्रकरणात फारूक टकलाचा सहभाग असून हल्लेखोरांना मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दाऊदची बहीण हसीना पारकरचा पती इब्राहिम पारकरच्या हत्येचा सूड घेण्यासाठी दाऊद टोळीकडून गवळी टोळीच्या शैलेश हळदणकरची हत्या करण्यात आली होती. १२ सप्टेंबर १९९२ मध्ये दाऊद टोळीकडून झालेल्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता.

टकला ६४ वा आरोपी

टकलाविरुद्ध सीबीआयने इंटरपोलच्या माध्यमातून १९९५ मध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. विविध देशांशी भारताने केलेल्या प्रत्यार्पण करारांच्या माध्यमातून २००२ पासून असंख्य आरोपी भारताच्या ताब्यात दिले आहेत. प्रत्यार्पणाच्या माध्यमातून भारतात आणण्यात आलेला टकला ६४ वा आरोपी आहे.

हेही वाचा-

१९९३च्या मुंबई बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ताहिर मर्चंटचा मृत्यू

दाऊदच्या मुंबईतील साम्राज्याला जबरदस्त हादरा!

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा