आयपीएल बेटिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

आयपीएल बेटिंगप्रकरणी देशातला बडा बुकी सोनू जलालच्या अटकेनंतर आता मोठी नावं समोर येऊ लागली आहेत. या आयपीएल सामन्यांवरील बेटिंगप्रकरणी ठाणे खंडणीविरोधी पथकानं आता मुख्य आरोपी सौरभ शाहू याला दिल्लीतून अटक केली आहे. शाहू विरोधात या पूर्वीही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.

काय आहे प्रकरण?

ठाणे पोलिसांनी १५ मे रोजी डोंबिवलीतून सट्टेबाजीचं रॅकेट चालवणाऱ्या चौघांना अटक केली होती. त्यातून बुकी सोनू जालानचं नाव पुढे आलं. पोलिसांनी सोनू जालानची कुंडली काढून त्याला मालाडहून अटक केली. त्याला ६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

कोण आहे सोनू?

सोनू जालान हा सट्टेबाजीच्या काळ्या दुनियेत सोनू मालाड म्हणून ओळखला जातो. संपूर्ण आशिया खंडात त्याचे नेटवर्क आहे. सोनूच्या चौकशीतून अभिनेता अरबाज खान, दिग्दर्शक पराग संघवी आणि अन्य बड्या लोकांची नावे पुढे आली होती. मात्र या सर्व प्रकरणामागे असलेल्या सौरभ शाहू हे प्रकरण उघडकीस आल्यावर फरार झाला. पोलिस त्याच्या मागावर होते.

कुठे लपला होता?

सौरभ दिल्लीतील त्याच्या घरी लपून बसला असल्याची माहिती ठाणे खंडणी विरोधीपथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सौरभला अटक केली. या पूर्वीही शाहूला २०१६ आणि २०१७ मध्ये सट्टेबाजी प्रकरणात अटक केली होती. त्यामुळे शाहूच्या चौकशीतून आता किती जणांची नावे पुढे येतात. त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


हेही वाचा-

असा खेळला जातो क्रिकेट सामन्यांवर सट्टा!

पतीला विकत देते का? प्रेयसीने देऊ केले पैसे

रेल्वेत पुन्हा तरुणीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


पुढील बातमी
इतर बातम्या