रेल्वेत पुन्हा तरुणीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


रेल्वेत पुन्हा तरुणीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
SHARES

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तरुणींना धक्कादायक प्रसंगांना सामोरं जाव लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सीएसएमटी स्थानकावर एका प्रवाशानं तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहत हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाशीत महिलांच्या डब्यात येऊन एका तरुणानं अापले सर्व कपडे काढल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे महिलांच्या आणि खास करून तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी उमाशंकर विजयशंकर दुबे (२५) या माथेफिरूला अटक केली आहे.


तरुणीसमोर केलं हस्तमैथून

नवी मुंबईच्या कौपरखैरणे येथील एका गावात राहणारी तक्रादार महिला ९ जून रोजी आपल्या २२ वर्षीय मुलीसह वाशी-ठाणे लोकलच्या फस्ट क्लास डब्यातून सकाळी ७.२४ वाजता प्रवास करत होती. त्यांची लोकल घणसोली स्थानकावर आली असताना, एक इसम अात शिरला. त्यावेळी त्याने हा लेडिज डब्बा आहे का? असं विचारलं. तक्रारदार महिलेनं त्याला होकार दिल्यानंतर त्यानं स्वतःच्या पॅन्टची चेन काढून त्या महिलेसमोर हस्तमैथून करू लागला. डब्यात त्या दोघीच असल्यानं भीतीपोटी त्यांनी खिडकीजवळ येऊन आरडाओरड केली. पुढील स्थानक आल्यानंतर दुबे पळून गेला. या प्रकरणी महिलेनं वाशी पोलिस ठाण्यात माथेफिरूविरोधात तक्रार नोंदवली होती.


सापळा रचून केली अटक

त्यानुसार पोलिसांनी महिलेनं दिलेलं वर्णन आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे तरुणाची ओळख पटवली. त्यावेळी दुबे हा बेलापूरच्या सेक्टर-१४ मधील दिवाळे गावचा राहणार असल्याचे समजले. त्यानुसार वाशी पोलिसांनी त्याला शुक्रवारी रात्री सापळा रचून अटक केली. यासह वाशी रेल्वेच्या सबवेमध्ये असलेल्या अंधाराचा फायदा घेत महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या विवेक गायकवाड यालाही वाशी पोलिसांनी अटक केली आहे. घणसोली परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेला त्यानं सबवेमध्ये मागून येऊन मिठी मारण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा -

रेल्वे रुळांवर ठेवली जाणार 'ड्रोन'ने गस्त

लोकलच्या प्रवासात मुलगी विसरल्याचं ऐकलंय का कधी? मग हे वाचा...

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा