लोकलच्या प्रवासात मुलगी विसरल्याचं ऐकलंय का कधी? मग हे वाचा...

रात्रीच्या वेळीस घाई गडबडीत कल्याण रेल्वे स्थानकावर उतरताना एका दुधवाल्याला आपल्या मुलीचाच विसर पडला. मात्र आरपीएफ पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी त्याला परत मिळू शकली.

लोकलच्या प्रवासात मुलगी विसरल्याचं ऐकलंय का कधी? मग हे वाचा...
SHARES

मुंबईच्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये विसरभोळ्यांची कमी नाही. अनेक जण आपल्या महत्त्वाच्या वस्तू गर्दीत विसरतात. मात्र कुणी आपली पोटची मुलगी विसरल्याचं ऐकलंय का? नाही ना, नुकताच असाच एक प्रकार कल्याण स्थानकावर घडला आहे. रात्रीच्या वेळीस घाई गडबडीत रेल्वे स्थानकावर उतरताना एका दुधवाल्याला आपल्या मुलीचाच विसर पडला. मात्र आरपीएफ पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी त्याला परत मिळू शकली.


संपूर्ण प्रकार?

डोंबिवलीच्या उमेश नगर, सत्यवान चौकात राहणाऱ्या ओमप्रकाश हरिपाल यादव यांचा दुधाचा व्यवसाय आहे. गुरुवारी यादव आपल्या कुटुंबासह शिर्डीला गेले होते. दिवसभरच्या तपासानंतर यादव कुटुंबिय थकून गेले होते. दादर येथे उतरल्यानंतर त्यांनी डोंबिवलीला जाण्यासाठी रात्रीची शेवटची लोकल पकडली. लोकलच्या प्रवासादरम्यान सर्वांचाच डोळा लागला होता. ज्यावेळी कल्याण स्थानक आल्यानंतर सकाळी दुधाची लाईन टाकायची असल्यानं यादव घाई गडबडीत सर्व सामान घेऊन खाली उतरले. मात्र खिडकीजवळ झोपलेली त्यांची ६ वर्षाची मुलगी लतिका हिच्यावर त्यांचं लक्ष गेलंच नाही. यादव कुटुंबिय स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी घराची वाट धरली. त्यावेळी यादव यांचा मेव्हणा प्रकाश याने लतिका दिसत नसल्याचं यादव यांना सांगितलं. तोपर्यंत लोकल पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती.


आणि मुलगी भेटली

काय करावं हे सूचत नसताना यादव कुटुंबियांनी तातडीने कल्याण स्थानकावरील स्टेशन मास्तरशी संपर्क साधला. त्यानंतर स्टेशन मास्तराने दादर स्टेशन मास्तराशी संपर्क साधून आरपीएफ हेल्पलाईनला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यावेळी दादर आरपीएफ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लोकल दादर स्थानकावर पहाटे ४.४५ वा. आल्यानंतर मुलीचा डब्यांमध्ये शोध घेतला. त्यावेळी ललिता ही झोपलेली पोलिसांना आढळून आली. मुलगी भेटल्याचं कळल्यानंतर यादव यांचा जीव भांड्यात पडला. त्यानंतर यादव यांनी दादरला जाऊन आपल्या मुलीचा ताबा घेत आरपीएफ अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा