स्वस्तात सोने देण्याच्या अामिषाने २४ लाख लांबवले; ५ जणांना अटक

माहीम परिसरात कमी किंमतीत सोने देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांना लुबाडणाऱ्या ५ जणांना  माहीम पोलिसांनी अटक केली. या टोळीने ३ सप्टेंबर रोजी एका व्यापाऱ्याला २४ लाख रुपयांना गंडा घातला होता. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग लक्षात घेऊन त्यांच्या अटकेसाठी आरोपींची नावे गुप्त ठेवली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

माहीम स्थानकाजवळ बोलावलं

माहीम परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याला त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने कमी किंमतीत सोने देणाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगितलं. तसंच आपल्या सांगण्यावर तो तुलाही कमी किमतीत सोने विकू शकतो, असंही आमीष दाखवलं. त्यानुसार व्यापारी सोने खरेदीसाठी तयार झाला. त्यानंतर या टोळीतील एका आरोपीने त्यांना माहीम रेल्वे स्थानकाजवळ बोलावलं. ३ सप्टेंबर रोजी व्यापारी २४ लाख ५० हजार घेऊन तेथे पोहचला. तेथे भेटललेल्या एका अारोपीने व्यापाऱ्याला रहेजा रुग्णालयजवळील नागौरी हाॅटेलमध्ये नेले.

कारमधून फरार

हाॅटेलमध्ये त्यांचं बोलणं सुरू असताना कारमधून दुसरा अारोपी तेथे अाला. त्याने त्याने वेळ न दवडता पैसे आणले आहेत का असं विचारलं. व्यापाऱ्याने होकार दिल्यानंतर त्या अारोपीने सोने गाडीत असून अगोदर पैसे द्या मग गाडीतून सोने आणून देतो असं सांगितलं. त्यानुसार व्यापाऱ्याने पैसे दिल्यानंतर दुसरा अारोपी पैसे घेऊन गाडीजवळ गेला. मात्र,सोने अाणण्याएेवजी तो गाडीत बसून फरार झाला. हे पाहून व्यापारी त्याच्या मागे गेला. त्याचवेळी व्यापाऱ्याबरोबर असलेल्या अारोपीने तेथून पळ काढला.

१५ लाख हस्तगत

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने माहीम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ३ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीतून इतर दोघांनाही अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी १५ लाख ५८ हजार रुपये हस्तगत केले असून बाकी पैशांचा पोलिस शोध घेत आहेत.


हेही वाचा - 

नक्षलवादी कनेक्शन प्रकरण: ५ विचारवंतांना १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैद

किकी चॅलेंज करणाऱ्या तिघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या