लाॅकडाऊनमध्ये वाढ दिवस साजरीकरणं पोलिसाला पडलं महागात

मालाडमधील मालवणी हे ठिकाण सध्या कोरोनाचे हाॅटस्पॅाट म्हणून ओळखला जात असताना. या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना संदर्भात घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशासन मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. अशातच मालवणी पोलिस ठाण्यातील पोलिस  अधिकारी आणि कर्मचारी वाढदिवस साजरी केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला. या व्हिडिओत वाढ दिवस साजरी करताना सोशल डिस्टंसिगच्या नियमांचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर घडलेल्या प्रकरणाविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहे.

हेही वाचाः-मुंबईत मान्सून दाखल; मात्र 'मिठी'च्या पात्रात अजूनही कचऱ्याचे साम्राज्य

उत्तर मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खासस करून मालाड, मालवणी या परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा हाॅटस्पॅाट बनला आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनी हा परिसर पून्हा लाँकडाऊन करत या ठिकाणी कडक कारवाई सुरू केली. मात्र दुसरीकडे परिस्थितीचं गांभीर्य विसरून मालवणी पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याचा केक कापून आपला वाढदिवस साजरा केल्याने लाँकडाऊनच्या नियमांचा बहुदा पोलिसांनाच विसर पडल्याचे दिसून आले. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर त्यावर अनेकांनी टिका केल्या, तसेच वाढ दिवस साजरी करताना तेथे उपस्थित असलेल्यांच्या तोंडाला मास्क ही नव्हते. या वाढदिवसाला परिसरातील काही व्यक्तीही उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. संबधित अधिकाऱ्यांला घडलेल्या प्रकरणाचा खुलासाही मागण्यात आला असून या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या