Advertisement

मुंबईत मान्सून दाखल; मात्र 'मिठी'च्या पात्रात अजूनही कचऱ्याचे साम्राज्य

मिठी नदी वांद्रे-कुर्ला संकुलात जिथे प्रवेश करते, तिथे मुख्य रस्त्याजवळच त्यांना पात्रामध्ये वाहता कचरा दिसला.

मुंबईत मान्सून दाखल; मात्र 'मिठी'च्या पात्रात अजूनही कचऱ्याचे साम्राज्य
SHARES

मुंबईतील नदी व नल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळं दरवर्षी मुंबईची 'तुंबई' होते. त्यामुळं पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून या नदी व नाल्यांची साफसफाई केली जाते. मात्र, यंदा मिठी नदीच्या परिसरात कचऱ्याचे ढीग अजून शिल्लक आहेत. नद्यांसाठी कार्यरत असलेल्या रिव्हरमार्चच्या सदस्यांनी मंगळवारी वांद्रे-कुर्ला परिसरातील मिठी नदीची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांना मिठी नदीमध्ये अजूनही वाहता कचरा असल्याचं आढळून आलं.

रिव्हरमार्चनं दहिसर, ओशिवरा आणि पोयसर या नद्यांवरील काही ठिकाणी पाहणी केली होती. या पाहणीमध्ये त्यांना गाळ, कचरा आणि डेब्रीज दिसले होते. मिठी नदी वांद्रे-कुर्ला संकुलात जिथे प्रवेश करते, तिथे मुख्य रस्त्याजवळच त्यांना पात्रामध्ये वाहता कचरा दिसला. या परिसराच्या पुढे मिठीचे पात्र औद्योगिक कचऱ्यानं व्यापलेलं होतं.

याहून अधिक कचरा वाकोला नाला आणि मिठी नदी ज्या परिसरात मिळते त्या परिसरामध्ये असल्याचं समजतं. या परिसरामध्ये अनेक थर्माकोल बॉक्स पडलेले होते. खारफुटीमध्ये प्लास्टिकचा कचराही होता. या परिसरापासून कोविड सेंटर सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साचून ही परिस्थिती हाताबाहेर गेली तर त्यासाठी कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोट्यवधी गुंतवून उभे केलेले कोविड सेंटरलाही यामुळं धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी हा प्रवाही कचरा रोखण्यासाठी वाहत्या पाण्यात जाळी लावण्याबद्दल चर्चा झाली होती. मात्र ही उपाययोजना अजूनही अस्तित्वात नसल्याचं समजतं.



हेही वाचा -

Petrol, Diesel Price: सलग तिसऱ्या आठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

Dahi Handi Festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा