Advertisement

Petrol, Diesel price: सलग तिसऱ्या आठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ४० डॉलरच्या आसपास आहेत. मात्र, देशातील इंधन दर हे झपाट्यानं वाढत आहेत.

Petrol, Diesel price: सलग तिसऱ्या आठवाड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
SHARES

सलग तिसऱ्या आठवाड्यात कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ७ जूनपासून सुरु केलेली दरवाढ सलग १९व्या दिवशी सुरूच आहे. गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत १४ ते १५ पैशांनी वाढल्या आहेत. मागील १९ दिवसांत पेट्रोल ८.६६ रुपये तर डिझेल १०.३९ रुपयांनी महागलं आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ४० डॉलरच्या आसपास आहेत. मात्र, देशातील इंधन दर हे झपाट्यानं वाढत आहेत.

कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवले होते. गुरुवारी त्यामध्ये वाढ केली असून, मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.७० रुपये झाला आहे. त्यात १६ पैशांची वाढ झाली. तर डिझेलचा भाव ७८.३४ रुपये झाला आहे. डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीनं डिझेलच्या किंमती झपाट्यानं वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे.

दिल्लीत गुरुवारी पेट्रोलचा भाव ७९.९२ रुपये झाला. तर डिझेलमध्ये आज १४ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती ८० रुपयांवर गेल्या आहेत. दिल्लीत डिझेलचा भाव ८०.०२ रुपये झाला. बुधवारी तो ७९.८८ रुपये होता. कोलकात्यात पेट्रोल ८१.६१ रुपये आहे. तसंच, डिझेल ७५.१८ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.१८ रुपयांवर गेला आहे. त्यात १७ पैशांची वाढ झाली. तसंच, चेन्नईत डिझेलनं ७७.२९ रुपयांचा स्तर गाठला आहे.

कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. देशभरात ही दरवाढ झाली असून प्रत्येक राज्याच्या मूल्यवर्धित करानुसार (व्हॅट) दोन्ही इंधनांचे दर बदलते राहिले आहेत.



हेही वाचा -

Actor Govinda's Car Accident अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात

Containment Zones List In Mumbai: मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या ७६५ वर, 'ही' आहे यादी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा