Advertisement

Dahi handi festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द


Dahi handi festival 2020: यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द
SHARES

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सण व उस्तवाला चांगलाच फटका बसतो आहे. काही दिवसांवर दहिहंडी उत्सव येऊन ठेपला आहे. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतरचा नियम पालन करण बंधनकारक आहे. त्यामुळं यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीतर्फे बुधवारी घेण्यात आला.

श्रीकृष्ण जन्मसोहळा (अष्टमीची पूजा) साध्या पद्धतीने साजरा करण्याची सूचना विभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सुरक्षित वावराबाबतचे नियम यामुळे दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. 

मागील अनेक वर्षांपासून दहीहंडी आयोजनामध्ये अनेक अडचणी येत आहेत. मात्र राज्यभरातील गोविंदा पथके आणि समन्वय समितीच्या एकीमुळं दरवर्षी हा सण उत्साहात पार पडत होता. यंदा कोरोनामुळे मुंबईतील गोविंदा उत्सवाबाबत अनिश्चितता होती. त्यामुळे मुंबईतील गोविंदा पथकांचे लक्ष समन्वय समितीच्या निर्णयाकडे लागले होते. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनामुळे राज्याचे स्वास्थ्य बिघडले असताना दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून गोविंदांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर राखणे हा एकमेव पर्याय आहे. अशावेळी दहीहंडीसारख्या मानवी मनोऱ्यांचा खेळ कसा खेळणार, शासनाच्या सूचना असताना गोविंदांची एकत्र येण्याची जबाबदारी कशी घेणार असे अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. तसेच या खेळाचे आयोजन केल्यास यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती समितीच्या वतीने बाळा पडेलकर यांनी दिली.

दहिहंडी समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीतील काही ठरावीक मुद्दे

  • २०२० हे वर्ष वैश्विक अर्थारोग्य, मानसिकारोग्य आणि शारीरीकारोग्य यादृष्टीने जरा अवघडच जात आहे.
  • गेल्या १० वर्षाचा इतिहास पाहिला तर दहिहंडी ही दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतेच मग ते संकट निसर्गनिर्मित असो की मानवनिर्मित, सामाजिक असो की राजकीय ते या सणाच्या पाचवीला पुजलेले आहेच असे आढळून येईल. परंतु महाराष्ट्राच्या तरुणाईचा आणि आबालवृध्दांचा, मुली-महिलांचा आवडता, रांगडा सण नेहमीच त्या अडचणींवर मात करुन बाहेर पडलेला आहे. आपण सगळ्यांनी मिळून तो बाहेर काढलेला आहे हे ही तितकेच सर्वश्रुत सत्य आहे.
  • २०२० च्या या कोरोना संकटाने, या महामारीनेमात्र दहिहंडीला सामाजिक बांधिलकीच्या, वैयक्तिक स्वास्थाच्या, आर्थिक बाबींच्या यक्ष प्रश्नाच्या तोंडी दिले आहे. यावर्षीचा प्रत्येक सण तसा रद्दच झालेला आहे.
  • कोरोनामुळे प्रत्येकाची वैयक्तिक, राज्याची, पर्यायाने देशाची स्वास्थ्यसुरक्षा ही टांगणीला लागलेली आहे. मृत्यु आणि जगणं यामधली रेष फारच पुसट झाली आहे.
  • सामाजिक अंतर (Social Distancing ) हा एकमेव पर्याय आपणापुढे असताना दहिहंडी खेळ आपण खेळणार तरी कसे ? सरकारने तर तसा आदेशच दिलेला आहे जो प्रत्येकाच्या भल्याचाच आहे. कोणतीही लस आणि ठोस औषध उपाय नसताना आपण एकत्र येण्याची जबाबदारी घेणार तरी कसे.? 
  • या अशा एक ना अनेक प्रश्नांचा सारासार विचार करुन दहिहंडी समन्वय  समितीने असा निर्णय घेतला आहे की यावर्षी 'श्री कृष्णजन्म' (अष्टमीची पुजा) हा अत्यंत साध्या पध्दतीने (अर्थातच , सामाजिक अंतराचे भान ठेऊनच) साजरा करायचा.
  • विभागीय पोलीस अधिकारी त्याबद्दल सूचना करतीलच परंतु आपणच आपल्यावर ते बंधन घालून घेऊ जेणेकरुन पोलीस बांधवांवरचा  त्याविषयीचा ताण थोडा कमी होईल.
  • मंडळांची आर्थिक बाजू, आयोजक, सामाजिक अंतर या समीकरणाचा विचार करता दुसऱ्यादिवशीचा गोपाळकाला हा उत्सव अर्थातच होणार नाही आणि तो साजरा केला जाऊ नये असे दहिहंडी समन्वय समितीचे प्रामाणिक मत तर आहेच पण महाराष्ट्रातील प्रत्येक गोविंदापटूला, प्रत्येक दहिहंडी पथकाला कळकळीची विनंतीही आहे. हेही वाचा -

Actor Govinda's Car Accident अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात

Containment Zones List In Mumbai: मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या ७६५ वर, 'ही' आहे यादीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा