मुंबई गुप्तवार्ता विभाग प्रमुखपदी मिलिंद काथे यांची नियुक्ती

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकांची कार आणि हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिस गुन्हे शाखेचा गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे (सीआययू) प्रमुख  सचिन वाझे यांचं निलंबन करण्यात आलं होतं. एनआयएने सचिन वाझेंना अटक केली होती. यानंतर आता मुंबई पोलिस गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी मिलिंद काथे यांची निवड करण्यात आली आहे. 

अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली आणि त्यानंतर या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली होती. यामुळे मुंबई पोलिस गुन्हे शाखेचा गुन्हेगारी गुप्तवार्ता विभाग वादात सापडला होता. यानंतर वाझे यांना निलंबित करण्यात आलं. 

 वाझेंच्या जागी कोणाची नियुक्ती केली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं.  आता सचिन वाझेच्या जागी मिलिंद काठे यांची सीआययूच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिलिंद मधुकर काथे हे गुन्हे शाखेच्या कक्ष २ चे निरिक्षक होते. त्यांची सध्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त पदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर हेमंत नगराळे यांनी मुंबई पोलीस दलातील तब्बल ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये या बदल्यांत गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. सचिन वाझे यांच्या सीआययु युनिटचे एपीआय रियाझुद्दीन काझी व प्रकाश होवाळ यांचीही बदली करण्यात आली.


हेही वाचा -

  1. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा
  1. पुन्हा लाॅकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका- संजय निरूपम

पुढील बातमी
इतर बातम्या