Advertisement

म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन सोहळा ३१ मार्च रोजी पार पडणार आहे.

म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळ्यावरून भाजपची शिवसेनेवर टीका
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन सोहळा ३१ मार्च रोजी होणार आहे. बुधवारी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयानं नुकतंच मुख्यमंत्र्यांच्या दिवसभरातील विविध कार्यक्रमांची माहिती दिली. या माहितीनुसार उद्धव ठाकरे सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

यानंतर संध्याकाळी ५ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केलं जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचं ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत. मात्र निमंत्रितांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव नसल्याने भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://twitter.com/MMRDAOfficial अथवा http://parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,https://www.facebook.com/MahaDGIPR तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्वीटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे.

स्मारकाचे काम २ टप्प्यांत होणार 

मुंबई महापौर यांच्या निवसास्थानाच्या परिसरात होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने एकूण ४०० कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात स्थापत्य, विद्युत, वातानुकुलित यंत्रणा उभारणी, इमारतीच्या अंतर्गत आणि बाह्य सजावट, वाहनतळ उभारणी, बागबगिचा तयार करणे, रेनवॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामं केली जातील. या सर्व कामांसाठी पहिल्या टप्प्यात अंदाजे २५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यात लेझर शो,व्हर्च्यूअल रियालिटी शो उभारण्यावर भर

दुसऱ्या टप्प्यात बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अद्ययवतीकरणावर काम केले जाईल. राज्य सरकारकडून बाळासाहेबांच्या स्मारकासाठी दुसऱ्या टप्प्यात १५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानविषयक कामं केली जाणार आहेत. यामध्ये लेझर शो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्च्यूअल रियालिटी शो आणि तांत्रिक बाबींवर काम केले जाईल. इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ही कामं केली जातील.



हेही वाचा -

"रावरंभा" तून उलगडणार ऐतिहासिक प्रेमकहाणी..

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा