नेहरू नगरमध्ये अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एका अल्पवयीन मुलीला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आल्याने कुर्ल्यातील नेहरूनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी शनिवारी तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना १७ आॅक्टोबर रोजी घडल्याचे म्हटलं जात आहे. मुलीला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव इम्रान शाहीद शेख असं आहे. पोलिसांनी अटक करून स्थानिक न्यायालयासमोर हजर केलं असता, त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र हे प्रकरण माध्यमांद्वारे पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतलं. आरोपीवर पाॅस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या सहकाऱ्यांसह  ठक्कर बाप्पा काॅलनी, चेंबूर येथील आदर्श नगरमध्ये ट्युशन क्लासला जात असताना आरोपीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला. ही घटना संजीवनी नगर येथील एसआरए इमारतीजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजेदरम्यान घडली. पीडित मुलीने आरडाओरड करताच आरोपीने हातातील लोखंडी वस्तूने तिला अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण करून तेथून काढता पाय घेतला. या हल्ल्यात जखमी मुलगी जागीच बेशुद्ध झाली. दुर्दैवाची बाब म्हणजे तेथे उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तीने पीडित मुलीला मदत करण्याचा वा आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. 

पीडित मुलीच्या इमारतीजवळ इम्रान आणि त्याचे काही मित्र एका रिक्षात बसून मोठ्या आवाजात गोंधळ घालत होते. तेव्हा पीडित मुलीने त्यांना हळू आवाजात बोलण्यास सांगितल्याने इम्रानला या घटनेचा राग आला. त्यातूनच त्याने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे.

बघा, 'अशी' केली मारहाण

त्यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कुर्ला नगर पोलिसांनी भादंवि अंतर्गत ३२४ आणि ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला.


हेही वाचा -

सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात का झाला गुन्हा दाखल? वाचा...

ओला-उबेर खरंच सुरक्षित आहेत का?


पुढील बातमी
इतर बातम्या