नगरसेवक संजय तुर्डे यांना अटक

मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाचे महानगरपालिकेचे कंत्राटदार स्वप्नील दाते यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

संपूर्ण प्रकार?

कुर्ला परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामात दिरंगाई होत असल्यानं सोमवारी महापालिकेचे कंत्राटदार आणि अभियंता असलेल्या स्वप्नील दाते यांना मारहाण केल्याचा आरोप तुर्डे यांच्यावर करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी कुर्ला पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कुर्ला पोलिसांनी तुर्डे यांना अटक केली.

सध्या स्वप्नील दाते यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वच्छ भारत अभियानावरून दोघांमध्ये वाद झाला असल्याचं समजतं.


हेही वाचा -

‘मी मुख्यमंत्री’ नव्हे तर ‘मी घोटाळेबाज बोलतोय’- सचिन सावंत

पुढील बातमी
इतर बातम्या